मानसिक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल आरोग्यदायी 'लाफ्टर थेरपी'
मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपाय?
लाफ्टर थेरपी म्हणजे काय?
लाफ्टर थेरपी कशी करावी?
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताण, चिंता आणि मानसिक थकवा ही समस्या सामान्य झाली आहे. मानसिक तणाव वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. थकवा वाढणे, अशक्तपणा वाढणे, शरीरात संकारात्मक ऊर्जा नसणे, काम करण्याची इच्छा नसणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी न केल्यास संपूर्ण आयुष्य बिघडून जाण्याची इच्छा असते. त्यामुळे तणाव मागे सारून कायमच आनंदी जीवन जगणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत लाफ्टर थेरपी किया हसण्याचा सराव एक सोपा पण प्रभावी उपाय ठरतो. फक्त हसल्यानेच मानसिक तणाव कमी होतो असे नाही, तर शरीरातील अनेक प्रणालींवरही सकारात्मक परिणाम होतो. ही थेरपी नेमकी काय आहे, ती कशी केली जाते आणि तिचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत, ते जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास दीर्घकाळ राहील पोट भरलेले, शरीरात टिकून राहील ऊर्जा
लाफ्टर थेरपी म्हणून जाणीवपूर्वक हसण्याचा सराव. यात नैसर्गिक हसण्याबरोबरच काही वेळा कृत्रिम किंवा सत्रात्मक हसण्याचा सराव केला जातो. हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिन, डोपामिन आणि सेरोटोनिन सारखे रहॅप्पी हार्मोन्सर तयार होतात, जे तणाव कमी करतात, मूड सुधारतात आणि मानसिक ऊर्जा वाढवतात.
लाफ्टर योग सत्र गटात किंवा वैयक्तिक पद्धतीने हसण्याचे व्यायाम केले जातात. श्वासोच्छवास, हसण्याचे खेळ आणि हसण्याचे स्ट्रेचिंग यांचा समावेश असतो. दररोज हसणे मजेशिर गोष्टी वाचणे, कॉमिक्स पाहणे किंवा मित्र परिवारासोबत वेळ घालवणे, सुरवातीला कृत्रिम हसण्यापासून सुरूवात केली तरी हळूहळू नैसर्गिक आनंद येतो. मनावर लक्ष ठेवणे हसताना सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा. मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.
वयाच्या ४० नंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत आणि कडक
ताण आणि चिंता कमी होते. हसल्याने मन हलके होते, तणाव दूर होतो आणि चिंता कमी होते.हॅपी हार्मोन्स वाढल्यामुळे मन प्रसन्न राहते आणि नैराश्य कमी होते.हसल्यामुळे मेंदूकडे अधिक ऑक्सिजन पोहोचतो, लक्ष केंद्रित होणे आणि स्मरणशक्ती सुधारते.पोटाचे स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि अपचन, गैससारखे त्रास कमी होतात. नैसर्गिक पेनकिलर्स सक्रिय होतात, डोकेदुखी, सांधेदुखी किंवा पाठदुखी कमी होतात.
Ans: हसल्याने तणाव निर्माण करणारे हार्मोन्स (Cortisol) कमी होतात आणि स्नायूंना आराम मिळतो.
Ans: सुरुवातीला हळू हसा, मग आवाज वाढवा आणि शेवटी ताली वाजवून किंवा नाचून मोकळेपणाने हसा.
Ans: हसण्याला व्यायामासारखे वापरून ताण-तणाव, चिंता आणि मानसिक आजारांपासून मुक्ती मिळवणे.






