हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
हृदयाचे आरोग्य कशामुळे बिघडते?
रोजच्या आहारात कोणते पदार्थ खावेत?
हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?
जिवंत राहण्यासाठी हृदय कायमच चालू असणे आवश्यक आहे. हृदयाचे ठोके बंद झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सर्वच वयोगटातील लोकांनी शरीराची योग्य काळजी घ्यावी. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे विविध आजार होण्याची खूप जास्त शक्यता असते. शारीरिक हालचालींचा अभाव जाणवू लागल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्दात्ब वाढल्यानंतर हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे वेळोवेळी हृदयाच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)
हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होण्याच्या महिनाभर आधी अनेक वेगवेगळी असामान्य लक्षणे दिसू लागतात. पण या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले केले जाते. दैनंदिन काम करताना वाढलेला थकवा, थोडे चालल्यावर किंवा जिने चढल्यावर धाप लागत नसेल, छातीत दुखणे, जडपणा किंवा जळजळ ही लक्षणे हृदयाचे कार्य बिघडल्यानंतर दिसू लागतात. याशिवाय हृदयाचे ठोके वाढणे, अचानक चक्कर येणे किंवा घाम फुटणे या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
हृदयाचे आरोग्य चांगले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी नियमित चाचण्या करणे आवश्यक आहे. वाढलेला उच्च रक्तदाब हृदयावर जास्तीचा तणाव निर्माण करतो. त्यामुळे कायमच रक्तदाब नियंत्रणात असणे आवश्यक आहे. रक्तात वाढलेले LDL आणि HDL कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियमित तपासणे आवश्यक आहे. रक्तात वाढलेली साखरेची पातळी कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या समस्येचे गंभीर कारण ठरते. ECG, 2D इको किंवा ट्रेडमिल टेस्ट यांसारख्या चाचण्या करून हृदयाचे ठोके तपासले जातात.
मानसिक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल आरोग्यदायी ‘लाफ्टर थेरपी’, कायमच राहाल आनंदी
हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये आणि सुकामेवा, बियांचा समावेश करावा. तसेच तेलकट, तिखट, तळलेले पदार्थ, फास्ट फूड आणि जास्त साखर असलेले पदार्थ अजिबात खाऊ नये. रोजच्या आहारात मीठ जास्त खाल्ल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. याशिवाय ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले पदार्थ, अक्रोड, जवस इत्यादी पदार्थ खाल्ल्यास उतार वयात सुद्धा हेल्दी राहाल. दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकल चालवणे, योगासने किंवा हलका व्यायाम केल्यामुळे हृदय मजबूत राहते आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.
Ans: छातीच्या मध्यभागी अस्वस्थता, दाब जाणवणे, जडपणा किंवा वेदना, जी काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते.
Ans: अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही दिवस किंवा आठवडे आधी, छातीत दुखणे (Angina) किंवा जडपणा जाणवणे.
Ans: विलंब न करता रुग्णवाहिका बोलवा किंवा जवळच्या रुग्णालयात जा.






