रुद्राक्षाचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात दिसून येतील चमत्कारतील बदल
भारतासह जगभरात सगळीकडे रुद्राक्षाला धार्मिक महत्व आहे. शंकराच्या भक्त गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालतात. भगवान शंकराचा थेट आशीर्वाद मिळवण्यासाठी गळ्यात रुद्राक्ष घातले जाते. हे रुद्राक्ष केवळ धार्मिक गोष्टींसाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. रुद्राक्षाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात, हे आपल्यातील अनेकांना माहिती नसेल. या पाण्याचे सेवन करणे अतिशय पवित्र मानले जाते. आयुर्वेदामध्ये रुद्राक्षाला विशेष महत्व आहे. बऱ्याचदा तुम्ही पहिले असेल अनेक लोक गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालतात. यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी रुद्राक्षाचे पाणी प्यायल्यामुळे शारीरिक, मानसिक तणाव कमी होण्यास मदत होईल. याशिवाय तुमच्या जीवनशैलीत अनेक बदल दिसून येतील. शरीरसंबंधित गंभीर आजार आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी रुद्राक्षाचे पाणी प्यावे. आज आम्ही तुम्हाला रुद्राक्षाचे पाणी बनवण्याची सोपी कृती आणि यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्यातील अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष केल्यास शरीराला हानी पोहचेल. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित रुद्राक्षाचे पाणी प्यावे. रुद्राक्षाचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. याशिवाय हृदयावर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रुद्राक्षाचे पाणी प्यावे. हे पाणी शक्यतो उपाशी पोटी प्यायल्यास अनेक बदल शरीरात दिसून येतील.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तणावात जगत आहे. कामाचा तणाव, चिंता, नैराश्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात वाढलेला तणाव कमी करण्यासाठी सकाळी उठून उपाशी पोटी रुद्राक्षाचे पाणी प्यावे. यामुळे मेंदूच्या नसा शांत होतात, नर्वस सिस्टीम कमी होते, शांत झोप लागते, चिडचिड कमी होते, मनावरील भार हलका होतो इत्यादी अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
रुद्राक्षाचं पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ग्लासात पाणी भरून घ्या. त्यानंतर त्यात २ किंवा ३ चांगल्या गुणवत्तेचे रुद्राक्ष पाण्यात टाकून ठेवा. रात्रभर पाणी झाकून ठेवा. त्यानंतर सकाळी उठून या पाण्याचे उपाशी पोटी सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.