Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिगमेंटेशनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ त्वचा करतील उजळदार, त्वचेच्या सर्व समस्या होतील गायब

त्वचेवर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बाजारातील महागड्या क्रीम वापरण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होईल. जाणून घ्या घरगुती उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2025 | 10:00 AM
पिगमेंटेशनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ त्वचा करतील उजळदार

पिगमेंटेशनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ त्वचा करतील उजळदार

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिलांना सुंदर आणि उजळदार त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे स्किन केअर केले जाते. वेगवेगळ्या ब्रँडचे टोनर, सनस्क्रीन किंवा इतर अनेक प्रॉडक्ट लावून त्वचेची काळजी घेतली जाते. वाढत्या वयात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन. चेहऱ्यावर पिगमेंटेशन वाढल्यानंतर महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक वेगवेगळे उपाय करतात. याशिवाय सोशल मीडियावर पाहून वेगवेगळ्या क्रीम, लोशन लावले जातात. याशिवाय काही महिलांना गाल, ओठ किंवा हनुवटीच्या आजूबाजूला पिगमेंटेशन वाढू लागते. त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन मेकअप केल्यानंतर सुद्धा कमी होत नाही. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करू नये.(फोटो सौजन्य – istock)

महिलांच्या त्वचेसाठी वरदान ठरेल कोरफड गर! ‘या’ पद्धतीने करा नियमित वापर, त्वचेवर दिसून येईल चमकदार ग्लो

चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन, मुरूम, पिंपल्स किंवा फोड घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन वाढू लागल्यानंतर त्वचा अधिकच काळी वाटू लागते. त्वचेवरील संपूर्ण ग्लो कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होईल.

पिगमेंटेशन कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थ:

बटाटा:

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना बटाट्याचा वापर केला जातो. बटाट्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही बटाटा स्वच्छ धुवून पातळ चकत्या करा. कापून घेतलेल्या बटाट्याच्या चकत्या पाण्यात ठेवून नंतर त्वचेवर ठेवा. यामुळे त्वचा वाढलेले पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर बटाटा हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्यावर फिरवून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन कमी होईल आणि त्वचा उजळदार सुंदर दिसेल.

मसूर डाळ:

त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मसूर डाळ अतिशय प्रभावी ठरते. मसूरची डाळ त्वचा आतून स्वच्छ करते. याशिवाय त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मसूर डाळ अतिशय प्रभावी आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ घेऊन बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात कच्चे दूध मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेले सर्व पिगमेंटेशन कमी होईल.

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीने बनवा फेसमास्क, जावेद हबीबचा सोपा घरगुती उपाय

टोमॅटो:

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि अ‍ॅसिडिक घटक चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी मदत करतात. संपूर्ण पिकलेल्या टोमॅटोचा रस काढून संपूर्ण चेहऱ्यावर लावून नंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवरील काळे डाग, पिगमेंटेशन इत्यादी कमी होण्यास मदत होईल. काहीवेळ ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dull skin due to pigmentation these ingredients in the kitchen will brighten the skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
1

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार
2

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
3

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब
4

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.