
काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये ई-कचरा रिसायकलिंग! पर्यावरण, आरोग्य व अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार जनजागृती
प्रत्येक वर्षी मुंबईमध्ये काळाघोडा फेस्टिवलचे आयोजन केले जाते. या फेस्टिवलमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी कायमच पाहायला मिळतात. मोबाईल, संगणक, बॅटरी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारा ई-कचरा हा पर्यावरणासाठी मोठा धोका ठरत असताना, कालाघोडा कला महोत्सवात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या ई-वेस्ट रिसायकलिंग स्टॉलने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या स्टॉलच्या माध्यमातून ई-कचरा रिसायकलिंग किती आवश्यक आहे आणि ते पर्यावरण, आरोग्य व अर्थव्यवस्थेसाठी कसे फायदेशीर आहे, याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या मे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनी ही मोहीम राबवत आहे. ई-कचऱ्यात शिसे, पारा, कॅडमियम यांसारखी घातक रसायने असतात. ती माती, पाणी आणि हवेत मिसळल्यास गंभीर प्रदूषण होते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा
योग्य पद्धतीने रिसायकलिंग केल्यास हे प्रदूषण टाळता येते, तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणामही कमी करता येतात, अशी माहिती स्टॉलवर देण्यात आली आहे. मोवाईल, संगणक आणि बॅटरीमधून ताबे सोने, चांदी, लिथियम यासारखे मौल्यवान धातू पुन्हा मिळवता येतात, त्यामुळे नवीन खनिज उत्खननाची गरज कमी होते. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण, ऊर्जा बचव आणि जंगलतोडीवरही आळा बसतो.
तसेच ई-वेस्ट रिसायकलिंगमुळे हरित उद्योगांना चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. भारत सरकारच्या इवेस्ट मॅनेजमेंट नियमानुसार ई-कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन करणे बंधनकारक असल्याची माहितीही या स्टॉलद्वारे नागरिकांना देण्यात आली.
या उपक्रमाबाबत माहिती देताना इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजर वैशाली पेठे आणि भाग्यश्री लोखंडे यांनी सांगितले की, “आज नागरिकांनी ई-कचऱ्याचे योग्य रिसायकलिंग केले, तरच उद्याच्या पिढीसाठी स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण निर्माण होऊ पर्यावरण शकते. “कलेसोबतच संरक्षणाचा संदेश देणारा हा स्टॉल कालाघोडा महोत्सवातील एक महत्त्वाचा आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम ठरत आहे.