Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुळथाची पिठी कशी बनवायची? चवीला भारी, आरोग्यालाही पौष्टिक… वासाने स्वयंपाकघरात सुटेल घमघमाट; लगेच नोट करा रेसिपी

Kulthachi Pithi Recipe : तळकोकणातील भागांमध्ये सुप्रसिद्ध असणारी कुळथाची पिठी थंडीच्या वातावरणात आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. गरमा गरम भातासोबत तर ती फारच उत्तम लागते आणि झटपट तयारही होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 07, 2025 | 09:30 AM
कुळथाची पिठी कशी बनवायची? चवीला भारी, आरोग्यालाही पौष्टिक... वासाने स्वयंपाकघरात सुटेल घमघमाट; लगेच नोट करा रेसिपी

कुळथाची पिठी कशी बनवायची? चवीला भारी, आरोग्यालाही पौष्टिक... वासाने स्वयंपाकघरात सुटेल घमघमाट; लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

आपल्या महाराष्ट्रात कुळथाचे (हुलगे) खूप महत्त्व आहे. विशेषतः हिवाळ्यात कुळथाचे पदार्थ खाल्ले की शरीराला उष्णता मिळते, हाडे मजबूत होतात आणि पचनही चांगले राहते. कुळथाचे सूप, पिठलं, पिठी असे अनेक प्रकार घराघरात बनवले जातात. ग्रामीण भागात तर कुळथाच्या पिठीला फार मोठे स्थान आहे. ही भाजी साध्या जेवणातही छान लागते, तसेच भाकरीसोबत तिची जोडीदार चवदार होते.

महाराष्ट्राचा फेमस आणि पारंपरिक पदार्थ ज्वारीचे शेंगोळे कधी खाल्ले आहेत का? रसरशीत भाजी अन् चव चाखाल तर फॅन व्हाल

कुळथाची पिठी ही पौष्टिक, झटपट आणि पारंपरिक डिश आहे. हिच्या सेवनाने शरीराला आवश्यक प्रथिने (प्रोटीन), कॅल्शियम आणि लोह मिळते. हिवाळ्यात अंग गरम ठेवण्यासाठी, थंडीपासून बचाव करण्यासाठी कुळथाचे पदार्थ जरूर खाल्ले जातात. तुम्ही ही पिठी भात, भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता. साधी पण मनाला सुख देऊन जाणारी ही रेसिपी एकदा घरी बनवून पहाच. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • १ कप कुळथाचे पीठ
  • ३-४ लसूण पाकळ्या
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १ कांदा (बारीक चिरलेला)
  • २ टेबलस्पून तेल
  • १/२ टीस्पून मोहरी
  • १/२ टीस्पून जिरे
  • हिंग चिमूटभर
  • हळद १/४ टीस्पून
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर सजावटीसाठी
कोलकाता फेमस पुचका आता घरीच बनवा; मसालेदार स्टफिंग, कुरकुरीत पुरी आणि चटकेदार पाण्याची चव; नाश्त्यासाठीची परफेक्ट रेसिपी

कृती

  • कुळथाची पिठी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि हळद टाका.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची व लसूण घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • आता त्यात पाणी घालून उकळी आणा.
  • पाणी उकळल्यावर हळूहळू कुळथाचे पीठ घाला आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत ढवळत राहा.
  • मीठ घालून मध्यम आचेवर ८-१० मिनिटे शिजू द्या.
  • पिठी घट्टसर होईल आणि छान सुगंध यायला लागेल.
  • शेवटी वरून कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.
  • गरमागरम कुळथाची पिठी भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाताबरोबर खायला खूपच स्वादिष्ट लागते.
    हिवाळ्यात ही डिश शरीराला उष्णता देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

FAQs (संबंधित प्रश्न)

कुळथाची पिठी म्हणजे काय?
कुळथाची पिठी ही कुळथाच्या पिठापासून बनवली जाणारी एक पातळ भाजी किंवा आमटी आहे. ही विशेषतः कोकण आणि तळकोकणातील भागांमध्ये प्रसिद्ध आहे.

पदार्थाची प्रमुख वैशिष्ट्ये काय?
हा पदार्थ फार झटपट तयार होतो ज्यामुळे जास्त वेळ वाया जात नाही. कुळथ हे एक पौष्टिक धान्य आहे आणि त्याची पिठी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

Web Title: Easy and tasty kulthachi pithi recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • food recipe
  • kokan
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.