• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Famous And Traditional Dish Of Maharashtra Shengole Recipe In Marathi

महाराष्ट्राचा फेमस आणि पारंपरिक पदार्थ ज्वारीचे शेंगोळे कधी खाल्ले आहेत का? रसरशीत भाजी अन् चव चाखाल तर फॅन व्हाल

ज्वारीचे शेंगोळे हा ग्रामीण भागातील एक फेमस पदार्थ आहे ज्यात ज्वारीचे शेंगोळे झणझणीत रश्श्यात शिजवून खाण्यासाठी सर्व्ह केले जातात. हा पदार्थ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अधिकतर खाल्ला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2025 | 12:21 PM
महाराष्ट्राचा फेमस आणि पारंपरिक पदार्थ ज्वारीचे शेंगोळे कधी खाल्ले आहेत का? रसरशीत भाजी अन् चव चाखाल तर फॅन व्हाल

(फोटो सौजन्य: youtube)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. गावोगावी, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक रेसिपी अजूनही आपल्या घराघरात जपल्या जातात. अशाच एका पारंपरिक व पौष्टिक डिशचे नाव आहे – शेंगोळे. ग्रामीण भागात तर याला एक वेगळीच ओळख आहे. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात गरमागरम शेंगोळ्यांचा रस्सा आणि भात ही एक अप्रतिम मेजवानी ठरते. यामध्ये बाजरी किंवा ज्वारीच्या पिठाचा वापर केल्याने हे अधिक पौष्टिक होते. मसालेदार रस्स्यात उकडलेले शेंगोळे मऊसर आणि स्वादिष्ट लागतात.

सेलिब्रिटींच्या आवडीचा नाश्ता अवोकाडो टोस्ट घरी कसा बनवायचा? आजच जाणून घ्या हेल्दी पण तितकीच चविष्ट अशी रेसिपी

शेंगोळ्यांची खासियत म्हणजे हे घरगुती, सोपे आणि पोटभरीचे जेवण आहे. यात कारल्याच्या, वांग्याच्या, शेवग्याच्या शेंगा किंवा इतर भाज्या घालून त्याला अजून चविष्ट करता येते. यामुळे हे केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. चला तर पाहूया महाराष्ट्रीयन स्टाईल शेंगोळे कसे करायचे.

साहित्य:

  • २ कप ज्वारी किंवा बाजरीचं पीठ
  • १ कप गव्हाचं पीठ
  • २ टेबलस्पून तांदळाचं पीठ
  • १ कांदा (बारीक चिरलेला)
  • २ टोमॅटो (बारीक चिरलेले)
  • १ कप शेवग्याच्या शेंगा (ऐच्छिक)
  • २ टीस्पून लाल तिखट
  • १ टीस्पून हळद
  • २ टीस्पून धने-जिरे पावडर
  • १ टीस्पून गोडा मसाला
  • चवीनुसार मीठ
  • २ टेबलस्पून तेल
  • १ टीस्पून मोहरी, जिरे
  • कढीपत्ता, कोथिंबीर सजावटीसाठी
  • आवश्यकतेनुसार पाणी

सकाळ करा हेल्दी, सकाळच्या नाश्त्याला कडधान्यांपासून बनवा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेला चविष्ट चिला

कृती:

  • सर्वप्रथम ज्वारी/बाजरीचे पीठ, गव्हाचे व तांदळाचे पीठ एकत्र करून त्यात मीठ व थोडंसं गरम पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्या.
  • या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन हाताने लांबसर शेंगोळे वळून तयार करून बाजूला ठेवा.
  • एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकून फोडणी द्या.
  • त्यात कांदा परतून घ्या. नंतर टोमॅटो टाकून मऊ होईपर्यंत शिजवा.
  • आता हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर, गोडा मसाला टाकून मसाला छान परता.
  • यामध्ये शेंगा किंवा हवी ती भाजी टाकून थोडं शिजू द्या. मग भरपूर पाणी घालून रस्सा उकळायला ठेवा.
  • रस्सा उकळला की तयार केलेले शेंगोळे त्यात टाका आणि मंद आचेवर झाकण ठेवून १५-२० मिनिटे शिजवा.
  • वरून कोथिंबीर टाकून गरमागरम शेंगोळे भाताबरोबर किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.

FAQs (संबंधित प्रश्न)

शेंगोळे कशापासून बनवतात?
शेंगोळे बनवण्यासाठी मुख्यत्वे ज्वारीचे पीठ वापरले जाते, परंतु काही वेळा गव्हाचे पीठ आणि बेसन (हरभऱ्याचे पीठ) देखील वापरले जाते.

हे पौष्टिक आहेत का?
होय, ज्वारी आणि इतर धान्यांच्या पिठांपासून बनवलेले असल्यामुळे हे अतिशय पौष्टिक असतात.

Web Title: Famous and traditional dish of maharashtra shengole recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • food recipe
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा परफेक्ट पालक-कॉर्न टोस्ट, हेल्दी पदार्थ शरीरासाठी ठरतील पौष्टिक
1

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा परफेक्ट पालक-कॉर्न टोस्ट, हेल्दी पदार्थ शरीरासाठी ठरतील पौष्टिक

Diwali 2025: दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा थंडगार चीज चहा, अनोख्या रेसिपीने करा पाहुण्यांचे स्वागत
2

Diwali 2025: दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा थंडगार चीज चहा, अनोख्या रेसिपीने करा पाहुण्यांचे स्वागत

Winter Special : थंडीच्या वातावरणात घरी बनवा पौष्टिक अन् कुरकुरीत ‘पालक वडे’; नोट करा रेसिपी
3

Winter Special : थंडीच्या वातावरणात घरी बनवा पौष्टिक अन् कुरकुरीत ‘पालक वडे’; नोट करा रेसिपी

हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग ज्वारीच्या पिठाचा ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग ज्वारीच्या पिठाचा ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हरियाणात एका शोरूमला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

हरियाणात एका शोरूमला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

Oct 21, 2025 | 07:36 AM
Amazon Vs Flipkart: iPhone 16 वर कुठे मिळतेय बेस्ट डिल? ऑर्डर करण्यापूर्वी तपासा किंमत

Amazon Vs Flipkart: iPhone 16 वर कुठे मिळतेय बेस्ट डिल? ऑर्डर करण्यापूर्वी तपासा किंमत

Oct 21, 2025 | 07:23 AM
Diwali 2025: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर या मंत्रांचा करा जप, जीवनात होईल फायदा 

Diwali 2025: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर या मंत्रांचा करा जप, जीवनात होईल फायदा 

Oct 21, 2025 | 07:05 AM
बजेट प्लॅन असा ज्यामुळे काही मिनिटातच Tata Safari होईल तुमच्या नावावर, किती असेल EMI?

बजेट प्लॅन असा ज्यामुळे काही मिनिटातच Tata Safari होईल तुमच्या नावावर, किती असेल EMI?

Oct 21, 2025 | 06:15 AM
लक्ष्मीमातेचे आगमन म्हणजे घरात प्रकाश… ! लक्ष्मीपूजनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश, सणावारांची वाढेल आणखीनच रंगत

लक्ष्मीमातेचे आगमन म्हणजे घरात प्रकाश… ! लक्ष्मीपूजनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश, सणावारांची वाढेल आणखीनच रंगत

Oct 21, 2025 | 05:30 AM
पायातील ‘हे’ बदल ठरतील जीवघेणे! वाढतील आजार, जाणून घ्या

पायातील ‘हे’ बदल ठरतील जीवघेणे! वाढतील आजार, जाणून घ्या

Oct 21, 2025 | 04:15 AM
Diwali 2025 : लक्ष्मीपूजन अमावस्येला का येतं? अमावस्या खरंच वाईट असते, जाणून घ्या समज आणि गैरसमज

Diwali 2025 : लक्ष्मीपूजन अमावस्येला का येतं? अमावस्या खरंच वाईट असते, जाणून घ्या समज आणि गैरसमज

Oct 21, 2025 | 03:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM
Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Oct 20, 2025 | 05:31 PM
Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Oct 20, 2025 | 05:16 PM
Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Oct 20, 2025 | 04:51 PM
Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Oct 20, 2025 | 04:40 PM
Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Oct 20, 2025 | 03:51 PM
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.