I Love You... मेसेज वाचताच रिप्लाय करताय? थांबा, प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत हे धोकादायक स्कॅम्स
Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…
व्हॅलेंटाईन डे च्या निमित्त सायबर गुन्हेगारांची एक टोळी अॅक्टिव्हेट झाली असून ते लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवत आहेत. स्कॅमर्स केवळ लोकांच्या भावनांसोबत खेळत नाहीत तर त्यांच्या मेहनतीचे पैसे देखील लुबाडतात. अशाच तीन स्कॅम्कबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही स्कॅमर्सपासून सावध राहाल आणि तुमची फसवणूक केली जाणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हॅलेंटाईन डे निमित्त सुरु होणारे सर्वात सामान्य स्कॅम म्हणजे सरप्राईज गिफ्ट्स. या स्कॅममध्ये एक टेक्स्ट मेसेज व मेल पाठवला जातो, ज्यामध्ये सरप्राइज गिफ्टबाबत माहिती दिलेली असते. गिफ्ट रिसिव्ह करण्यासाठी तुम्हाला एक लिंक देखील पाठवली जाते, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल अॅड्रेस आणि इतर माहिती भरावी लागते. जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक करता तेव्हा एक थर्ड पार्टी वेबसाईट ओपन होते, जिथे तुमची माहिती आणि बँक डिटेल्स चोरले जातात.
या स्कॅममध्ये सोशल मीडियावर अनेक फेक पोस्ट व्हायरल केल्या जातात, ज्यामध्ये दावा केला जातो की तुम्ही प्रिमियम रिवॉर्ड्स जिंकू शकता. यामध्ये रोमांटिक डिनर, हॉलीडे व एक्सपेंसिव गिफ्ट फ्री मिळवण्याचे आमिष दाखवले जाते. रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरण्यास सांगितले जाते आणि यावेळी तुम्हाला प्रोसेसिंग फीस देखील भरावी लागते. पैसे आणि तपशील दिल्यानंतर, तुमचे बक्षीस तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तुमची फसवणूक होते.
या स्कॅमची सुरुवात व्हॅलेंटाईन वीक सुरु होण्यापूर्वीच केली जाते. यामध्ये तुम्हाला डेटिंग अॅप्स आणि सोशल मीडियाद्वारे असे काही लोक सापडतील जे कमीत कमी वेळात तुमचा विश्वास जिंकतात, तुमच्या जवळ येतात आणि आय लव्ह यू म्हणतात. यानंतर तुम्हाला डेटसाठी विचारले जाते. यानंतर तुमच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागितले जातात. पैसे मिळताच स्कॅमर्स गायब होतात आणि तुमची फसवणूक केली जाते.
अशा स्कॅम्सपासून सुरक्षित राहण्यासाठी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही मेसेजला रिप्लाय करण्यापूर्वी नंबर कोणाचा आहे, मेसेज कोणी केला आहे, याची तपासणी करणं देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.






