नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे होईल नष्ट! आहारात करा 'या' फायबर युक्त पदार्थांचा समावेश, हृदयाला मिळेल पोषण
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
रक्तवाहिन्या ब्लॉक कशामुळे होतात?
सर्वाधिक फायबर असलेले पदार्थ?
बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला हानी पोहचते. बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. याशिवाय तरुण वयात हार्ट अटॅक किंवा उच्च रक्तदाबाचा धोका वाढल्यामुळे शरीराची योग्य काळजी घेण्याचा सल्ला कायम दिला जातो. कारण आहारात सतत तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्याच्या परिणामामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हार्ट अटॅक आल्यानंतर वेळीच उपचार न केल्यास मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढल्यानंतर कायमच जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो. प्रामुख्याने कोलेस्टेरॉल, व्यायाम, रक्तदाब आणि औषधोपचार करून शरीराची काळजी घेतली जाते. पण हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी कोणत्या फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे, चला तर जाणून घेऊया. हे पदार्थ शरीरात जमा झालेली घाण बाहेर काढून टाकतात आणि रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास मदत करतात. याशिवाय हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
तिखट, तेलकट किंवा आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी जमा होते. अशावेळी फायबर असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील एलडीएलचे वाढलेले प्रमाण धमन्यांमध्ये अडथळे निर्माण करते. ज्यामुळे कालांतराने हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. द्रावणीय फायबर पचनसंस्थेत पाणी शोषून घेऊन जेलसारखा पदार्थ करते. हा पदार्थ पित्ताम्लाशी बांधला गेल्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडून जातात. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया मंदावते, रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते. लवकर काही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही.
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे तूरडाळ, मूगडाळ, राजमा, चणे, मटकी आणि मोड आलेली कडधान्ये, ओट्स, बार्ली, गहू, नाचणी, ज्वारी आणि बाजरी, पेरू, सफरचंद, नाशपाती, सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा. याशिवाय अळशीच्या बिया आणि चिया सीड्स शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरते.
Ans: होय. विशेषतः soluble fiber (विरघळणारे फायबर) आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे LDL म्हणजेच ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.
Ans: ओट्स, जवस, कडधान्ये, हरभरा, राजमा, फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांचा आहारात समावेश करता येतो.
Ans: फायबरयुक्त आहार LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो; मात्र रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले प्लाक किंवा कोलेस्ट्रॉल ‘कायमचे नष्ट’ होते असे म्हणणे योग्य नाही. कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.