Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

नारळ पाणी कायमचे ताजे प्यावे. शिळे किंवा उघड्यावरील नारळ पाणी प्यायल्यास मेंदूच्या नसांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया शिळे नारळ पाणी पिण्याचे तोटे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2026 | 05:30 AM
उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:

नारळ पाणी पिण्याचे फायदे?
शिळे नारळ पाणी पिण्याचे दुष्परिणाम?
नारळ पाणी पिण्याआधी कोणती काळजी घ्यावी?

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंड पेयांच्या मागणीमध्ये मोठी वाढ होते. कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळी पेय प्यायली जातात. त्यात वर्षाच्या बाराही महिने मिळणारे पेय म्हणजे नारळ पाणी. गोड चवीचे नारळ पाणी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं प्यायला खूप जास्त आवडते. शरीर आतून हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीराला तात्काळ ऊर्जा देण्यासाठी नारळ पाणी प्यायले जाते. नारळ पाणी प्यायल्यामुळे केवळ शरीरालाच नाहीतर त्वचेलासुद्धा भरमसाट फायदे होतात. यामुळे चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा येईल. पण बऱ्याचदा नारळ पाणी आणल्यानंतर त्यातील पाणी काढून फ्रिजमध्ये किंवा बाहेर असेच ठेवले जाते. तहान लागल्यानंतर उघडल्यावर असलेल्या सरबतच्या गाडीवरून काहीवेळा नारळ पाणी सुद्धा प्यायले जाते. पण शिळे नारळ पाणी शरीरासाठी विष ठरू शकते. चुकूनही उघड्यावर किंवा बाटलीमध्ये भरून ठेवलेले शिळे नारळ पाणी पिऊ नये. शिळे झाल्यानंतर त्याचे रूपांतर विषारी पेयांमध्ये होते. चला तर जाणून घेऊया शिळे नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम.(फोटो सौजन्य – istock)

Fatty Liver म्हणजे काय? लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

शिळे नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम:

नारळ पाणी विकत आणल्यानंतर ते जास्त वेळ ठेवल्यास त्यात विषारी घटक तयार होण्यास सुरुवात होते. हानिकारक बॅक्टेरिया वेगाने वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. मळमळ, उलट्या, जुलाब आणि पोटातील वेदना इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. खराब नारळ पाण्यात तयार झालेले विषाणू पचनक्रिया बिघडून आतड्यांमध्ये इन्फेक्शन वाढवतात, ज्याच्या परिणामामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होत नाहीत. त्यामुळे नारळ पाणी आणल्यानंतर ते अर्धा तासाच्या आधीच प्यावे. जास्त शिळे झालेले पाणी घरातील इतर व्यक्तींना अजिबात पिण्यास देऊ नये.

शिळ्या नारळ पाण्यात 3-nitropropionic acid असलेले विषारी घटक झपाट्याने तयार होतात. यामुळे चक्कर येणे, गोंधळल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तर काहीवेळा शरीरातील नसांचे नुकसान होते. नारळ पाण्यातील बुरशीजन्य विषारी घटकांमुळे फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होण्यास सुरुवात होते. फुफ्फुसांमध्ये जमा झालेल्या पाण्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय शरीराला गंभीर आजाराची लागण सुद्धा होऊ शकते. बऱ्याचदा नारळ पाणी शिळे झाल्यानंतर त्याचा वास बदलतो. त्यामुळे नारळ पाणी पिताना शंका निर्माण झाल्यास वेळीच सावध व्हावे.

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय

खराब आणि शिळ्या झालेल्या नारळ पाण्याच्या सेवनामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. कारण काही प्रकरणांमध्ये नारळ पाणी प्यायल्यानंतर मेंदूमध्ये संसर्ग होऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कायमच ताजे नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी पिताना त्यांचा रंग पिवळसर किंवा वास येत असल्यास नारळ पाणी अजिबात पिऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उघड्यावर ठेवलेले नारळ पाणी पिणे सुरक्षित आहे का?

    Ans: नाही, उघड्यावर ठेवलेले नारळ पाणी काही तासांत खराब होऊ शकते आणि त्यात जीवाणू वाढू शकतात.

  • Que: नारळ पाणी किती वेळात खराब होते?

    Ans: सामान्यतः उघडल्यानंतर 2-3 तासांत नारळ पाणी खराब होण्यास सुरुवात होते, विशेषतः उष्ण वातावरणात.

  • Que: नारळ पाणी कसे साठवावे?

    Ans: नारळ पाणी उघडल्यानंतर लगेच पिणे उत्तम. साठवायचे असल्यास ते फ्रिजमध्ये ठेवावे आणि 24 तासांत वापरावे.

Web Title: In open coconut water toxins are formed in a few hours know the side effects on the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Coconut water benefit
  • Health Care Tips
  • side effect

संबंधित बातम्या

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
1

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
2

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
3

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
4

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.