Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले ‘हे’ पौष्टिक लाडू केसांसाठी ठरतील प्रभावी, शरीराला मिळेल भरपूर पोषण

केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपाय करून केसांची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2025 | 10:02 AM
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले 'हे' पौष्टिक लाडू केसांसाठी ठरतील प्रभावी

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले 'हे' पौष्टिक लाडू केसांसाठी ठरतील प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला ताण, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराला आवश्यक पोषक तत्वे न मिळाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. यामुळे हाडांमध्ये वेदना वाढणे, अचानक चक्कर येणे किंवा सतत अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. यासोबतच केस गळण्यास सुरुवात होते. केस गळू लागल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा केसांचे गळणे थांबत नाही. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर हेअर केअर प्रॉडक्ट किंवा वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट करून केसांची काळजी घेतली जाते.(फोटो सौजन्य – pinterest)

धुतलेले केस ओले असताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, अन्यथा केस होतील झाडू सारखे खराब आणि कोरडे

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घ्यावी. केसांमधील आवश्यक पोषण कमी झाल्यानंतर सतत केस गळू लागतात किंवा केसांची मूळ अतिशय कमकुवत होऊन जातात. त्यामुळे केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी महिला आयुयर्वेदिक तेलांचा वापर करतात. या तेलांचा वापर करून केसांची वाढ होते पण केसांवर नैसर्गिक चमक टिकून राहत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी आहारात कोणता बदल करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

केस गळती थांबवण्यासाठी काळे तीळ, आळशी, शेवग्याची पावडर आणि आवळ्याची पावडर अतिशय गुणकारी ठरेल. हे पदार्थ टाळूला योग्य पोषण देतात. आवळा केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर घटक केसांच्या मुळांना पोषण देतात. यासोबतच अळशीच्या बियांचे सेवन केल्यामुळे केस गळती थांबते. यामध्ये ओमेगा-३ आणि लिग्रॅन्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर अळशीच्या बियांचे सेवन करावे. शेवग्याच्या शेंगामध्ये विटामिन ए, लोह आणि बायोटिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात शेवग्याची पावडर किंवा शेंगांचे सेवन करावे.

सुंदर त्वचेसाठी नेहमीच विकत साबण आणण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा अळशीचा साबण, त्वचा होईल मऊ आणि फ्रेश

पौष्टिक लाडू बनवण्याची कृती:

लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, अळशीच्या बिया आणि काळे तीळ पॅनमध्ये भाजून घ्या. खमंग भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर वाटीमध्ये काढून त्यात शेवग्याच्या शेंगांची पावडर आणि आवळ्याची पावडर टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात खजूर मिक्स करून लाडू बनवून घ्या. याशिवाय तुम्ही तयार केलेली पावडर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यासोबतच नियमित खाऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Enriched with ayurvedic properties these nourishing ladoos will be effective for hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • home remedies

संबंधित बातम्या

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग
1

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
2

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी
3

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ
4

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.