Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Skin Care: वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचेला मिळेल भरपूर पोषण! १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा Detox water

चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी नियमित डिटॉक्स वॉटर प्यावे. यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि उन्हाळ्यात सुद्धा त्वचा फ्रेश दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2026 | 09:18 AM
Summer Skin Care: वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचेला मिळेल भरपूर पोषण! १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा Detox water

Summer Skin Care: वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचेला मिळेल भरपूर पोषण! १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा Detox water

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. तसेच या दिवसांमध्ये शरीर लगेच थकून जाते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, ज्याच्या परिणामुळे थकवा, अशक्तपणा वाढून काहीवेळा रक्तदाब सुद्धा कमी होतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे त्वचा सुद्धा सुकल्यासारखी वाटते आणि चेहऱ्यावरील ग्लो निघून जातो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. वाढत्या उष्णतेमुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात अनेक बदल दिसू लागतात. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात वाढलेली उष्णता इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात.(फोटो सौजन्य – istock)

अभिनेत्री दीपिका पादुकोण चेहऱ्यावरील ग्लो आणि हेल्दी केसांसाठी नियमित पिते ‘हा’ मॅजिक ज्यूस, त्वचेवर येईल चमक

सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. कधी फेसमास्क लावला जातो तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण सतत केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटमुळे त्वचेची पोत खराब होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उन्हाळ्यात सुद्धा त्वचा फ्रेश आणि चमकदार ठेवण्यासाठी घरच्या घरी डिटॉक्स वॉटर तयार करावे. डिटॉक्स पेय प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि तुम्ही कायमच फ्रेश राहता.

डिटॉक्स वॉटर बनवण्याची सोपी कृती:

गुलाब पाणी, सब्जा, लिंबू, पुदिना, काकडी आणि बीट इत्यादी पदार्थांचा वापर करून डिटॉक्स वॉटर बनवले जाते. यासाठी एक लिटर पाण्यात सब्जा बिया, गुलाबाच्या पाकळ्या, लिंबाचा रस, पुदिन्याच्या पानांचे तुकडे, बीटचे तुकडे घालून पाणी चमच्याने मिक्स करा आणि झाकण लावून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाण्याचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. डिटॉक्स वॉटर प्यायल्यामुळे शरीराला आणि त्वचेला खूप जास्त फायदे होतात. तसेच गुलाबाच्या पाकळ्यांऐवजी तुम्ही गुलाब पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. गुलाबाच्या पाण्यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि त्वचा खूप जास्त फ्रेश दिसते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित डिटॉक्स पेयाचे सेवन करावे.

चेहऱ्यावरील केस होतील गायब! वाटीभर बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, वाचेल पार्लरचा अनावश्यक खर्च

शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि आतड्यांमधील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस अतिशय फायदेशीर ठरतो. तसेच पुदिन्याच्या पानांमध्ये असलेला नैसर्गिक थंडावा उष्णता कमी करून त्वचा फ्रेश आणि हायड्रेट ठेवतो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर काकड्या उपलब्ध होतात. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. काकडीमध्ये ९२ टक्के पाणी असते. त्यामुळे नियमित काकडी आणि थंड पदार्थांचे सेवन करावे. आठवड्यातून एकदा बीट खाल्ल्यास शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. यासोबतच रक्तातील घाण स्वच्छ झाल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Even in growing summer the skin will get plenty of nourishment prepare detox water at home in 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • detox drinks
  • glowing face
  • skin care tips

संबंधित बातम्या

चाळीशीनंतरही चेहरा दिसेल टवटवीत? अँटी-एजिंग क्रीमची गरज नाही! घरच्या घरी बनवा नैसर्गिक कोलाजन क्रीम
1

चाळीशीनंतरही चेहरा दिसेल टवटवीत? अँटी-एजिंग क्रीमची गरज नाही! घरच्या घरी बनवा नैसर्गिक कोलाजन क्रीम

Skin Care Tips: काचेसारख्या पारदर्शक त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब
2

Skin Care Tips: काचेसारख्या पारदर्शक त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब

चुकीच्या स्किन केअरमुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे चेहऱ्यावर येतात मोठे पिंपल्स आणि मुरूम, त्वचा होईल निस्तेज
3

चुकीच्या स्किन केअरमुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे चेहऱ्यावर येतात मोठे पिंपल्स आणि मुरूम, त्वचा होईल निस्तेज

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब
4

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.