Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब

शरीरावर नको असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्सिंग न करता घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही आणि केस निघून जातात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2026 | 09:50 AM
वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि स्वच्छ हवी असते. चेहऱ्यावर किंवा शरीरावर असलेले अनावश्यक केस कोणालाही नको असतात. हेच अनावश्यक केस काढण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन दर महिन्याला महागडी वॅक्सिंग, थ्रेडींग किंवा इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल हायड्रेटड हेअर रिमूव्हर क्रीम्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण या क्रीम कालांतराने त्वचेचे गंभीर नुकसान करतात. वॅक्सिंग करताना होणाऱ्या वेदना आणि शेविंगमुळे येणारे कडक केस महिलांना खूप जास्त त्रस्त करतात, तर काहींना वॅक्सिंग करण्याची भीती वाटते. शरीरावर असलेले केस त्वचेचे रक्षण करतात, पण काहीवेळा त्वचेच्या सौंदर्य कमी झाल्यामुळे शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकले जातात.(फोटो सौजन्य – istock)

एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय

नको असलेले केस काढून टाकण्यासाठी प्रामुख्याने वॅक्सिंग केले जाते. वॅक्सिंग करताना गरमगरम वॅक्स हातांवर लावल्यामुळे काहीवेळा चटका बसण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे घाबरून महिला वॅक्सिंग करत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी तुरटीचा वापर करून वॅक्सिंग करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने त्वचेवर वॅक्सिंग केल्यास केस निघून येण्यासोबतच डेड स्किन सुद्धा गायब होईल आणि त्वचा स्वच्छ दिसेल. तुरटीचा वापर करून बनवलेला नॅचरल हेअर रिमूव्हर साबण चेहऱ्यावरील केसांची ग्रोथ हळूहळू करतो. याशिवाय त्वचेचा नुकसान होत नाही. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

साहित्य:

  • तुरटी
  • गुलाब पाणी
  • साबण बेस
  • लिंबाच्या सालीची पावडर
  • तांदळाचे पीठ
  • बदाम तेल

कृती:

सर्वप्रथम वाटीमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यात तुरटीचा तुकडा भिजत ठेवा. खूप जास्त प्रमाणात गुलाब पाणी घेऊ नये. गुलाब पाण्यात तुरटी पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात लिंबाच्या सालीची पावडर घालून मिक्स करा. त्यानंतर काहीवेळ झाकण मारून तसेच ठेवून द्या. गरम पाण्याच्या वाफेवर साबण बेस पूर्णपणे वितळवून घ्या. त्यानंतर त्यात तुरटीचे मिश्रण ओतून चमचाभर तांदळाचे पीठ, बदाम तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण साबण मोल्ड मध्ये टाकून २ ते ३ तास सेट होण्यासाठी ठेवा. त्यानंतर साबण तयार होईल.

Hair Care Tips: केसांना तेल लावताना ‘या’ चुका टाळा; निरोगी, मजबूत अन् चमकदार केसांसाठी जाणून घ्या योग्य पद्धत

तयार केलेला साबण नैसर्गिक उपाय असल्यामुळे हळूहळू शरीरावर परिणाम करेल. तुमच्या शरीरावर खूप जास्त घनदाट केस असतील तर सगळ्यात आधी केस शेविंग करून काढा. त्यानंतर रोज अंघोळ करताना साबणाचा वापर करावा. यामुळे केसांची वाढ होणार नाही आणि त्वचेला कोणतेही नुकसान पोहचणार नाही. तुरटीमधील नैसर्गिक गुणधर्म केसांच्या मुळांना कमकुवत, ज्यामुळे नवीन केसांची झपाट्याने वाढ होत नाही. पण साबण वापरण्याआधी चेहरा किंवा शरीरावर वापरण्यापूर्वी हातावर वापरून पॅच टेस्ट करून घ्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Afraid of waxing make a natural hair remover at home using alum it will make the hair vanish

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय
1

एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय

वयाच्या विशीमध्येच केसांचा भांग मोठा झाला आहे? ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल हेअर स्प्रे
2

वयाच्या विशीमध्येच केसांचा भांग मोठा झाला आहे? ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल हेअर स्प्रे

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ
3

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी
4

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.