Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्किन्सन रोग म्हणजे काय? आजार नेमकं कसा सुरु होतो? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

पार्किन्सनचा आजार आता फक्त वृद्धापकाळातील विकार राहिलेला नाही. तो आता जगातील सर्वात वेगाने वाढणारा मेंदूविषयक (न्यूरोलॉजिकल) विकार बनला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 09, 2026 | 05:57 PM
पार्किन्सन रोग म्हणजे काय? आजार नेमकं कसा सुरु होतो? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

पार्किन्सन रोग म्हणजे काय? आजार नेमकं कसा सुरु होतो? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Follow Us
Follow Us:

पुणे : पार्किन्सनचा आजार आता फक्त वृद्धापकाळातील विकार राहिलेला नाही. तो आता जगातील सर्वात वेगाने वाढणारा मेंदूविषयक (न्यूरोलॉजिकल) विकार बनला आहे. सध्या सुमारे १ कोटी रुग्ण त्याने प्रभावित असून, ४० ते ५० वयोगटातील नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. पूर्वी वृद्धापकाळातील आजार मानल्या जाणाऱ्या या आजाराच्या तरुण रुग्णांमधील लक्षणीय वाढीमागे वाढलेली जागरूकता (ज्यामुळे रुग्ण लवकर वैद्यकीय सल्ला घेतात), वाढलेले आयुर्मान, पर्यावरणीय घटक आणि बदलत्या जीवनशैलीचा संबंध जोडला गेला आहे. यामध्ये सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण वेळेवर हस्तक्षेप केल्यास दीर्घकालीन आरोग्य, स्वावलंबन आणि जीवनमान सुधारता येते.

 

फक्त कंप म्हणजे पार्किन्सन नाही, सुरुवातीची लक्षणे हळूच डोकं वर काढतात.

याबाबत डॉ. भूषण मिशाळ सांगतात, “सामान्य समजुतीनुसार कंप ही पार्किन्सनची पहिली लक्षणे असतात. अनेक वेळा हा आजार अतिशय सूक्ष्म न्यूरोलॉजिकल बदलांपासून सुरू होतो, जे सहज दुर्लक्षित होत असतात.” सुरुवातीची लक्षणे म्हणजे वास घेण्याची क्षमता कमी होणे (अॅनोस्मिया), झोपेचे विकार जसे स्वप्नात बोलणे, हालचाली करणे, अक्षर लहान होत जाणे (मायक्रोग्राफिया), आणि हालचाली मंद होणे (ब्रॅडीकाइनेशिया). काही लक्षणे तर कंप सुरू होण्याच्या अनेक वर्षांपूर्वी दिसू शकतात, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण जाते. हा विकार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखण्यासाठी या ‘नॉन-मोटर’ लक्षणांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. कारण अनेक रुग्णांना पार्किन्सनचा आजार कंप दिसण्यापूर्वीच सुरू होतो हेच समजत नाही.

ही लक्षणे अनेकदा सामान्य वृद्धत्वाची समजली जातात

पार्किन्सनची सुरुवातीची अनेक लक्षणे ही वृद्धत्वाचा भाग समजून दुर्लक्षित केली जातात. सतत बद्धकोष्ठता, थोडे वाकलेले शरीर, आणि चेहऱ्यावर भाव कमी दिसणे (मास्क्ड फेस) ही लक्षणे थकवा किंवा वयामुळे होणारे बदल म्हणून गृहीत धरले जातात.
परंतु ही लक्षणे स्नायू नियंत्रण आणि समन्वयावर परिणाम करणाऱ्या न्यूरोलॉजिकल समस्यांचे संकेत असू शकतात. अशा चुकीच्या समजुतीमुळे उपचारांना उशीर होऊ शकतो.

उशीर जो महत्त्वाचा वेळ हिरावून घेतो

सरासरी, सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर रुग्णांना न्यूरोलॉजिस्टकडे जाण्यास १ ते ३ वर्षे लागतात. बहुतेक लोक कंप, तोल जाणे, कडकपणा किंवा पडणे यांसारखी स्पष्ट लक्षणे दिसल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात. तोपर्यंत आजार बऱ्याच प्रमाणात पुढे गेलेला असतो. लवकर सल्ला घेतल्यास डॉक्टर उपचार लवकर सुरू करू शकतात, ज्यामुळे आजाराची प्रगती मंदावू शकते आणि स्वावलंबी जीवन टिकवून ठेवता येऊ शकते.

धोक्याचे घटक जाणून घेणे

वाढते वय हा पार्किन्सनचा सर्वात मोठा धोका-घटक आहे, पण हा आजार एकाच कारणामुळे होत नाही. सुमारे १०–१५% प्रकरणांमध्ये जनुकीय कारणे असतात, जसे LRRK2 किंवा GBA म्युटेशन. तसेच कीटकनाशके आणि जड धातूंशी दीर्घकाळ संपर्क, विशेषतः पॅराक्वॉटसारख्या रसायनांशी संपर्क, हा देखील घटक कारणीभूत ठरू शकतो. याउलट, नियमित एरोबिक व्यायाम उपयुक्त ठरू शकतो आणि आजाराची लक्षणे उशिरा सुरू करण्यास मदत करू शकतो.

लवकर निदान का महत्त्वाचे आहे आणि ते कसे केले जाते?

पार्किन्सनचे लवकर निदान केल्यास जीवनमान सुधारता येते. लवकर व्यायाम आणि उपचार सुरू केल्यास दीर्घकाळ हालचाल आणि स्वावलंबन टिकवून ठेवता येते. तीव्र एरोबिक व्यायाम हा आजाराची प्रगती कमी करण्यास मदत करणारा एक महत्त्वाचा उपाय मानला जातो. पार्किन्सनच्या आजाराचे निदान करण्यासाठी नेमकी एक अशी कोणतीही रक्त चाचणी उपलब्ध नाही. निदान प्रामुख्याने क्लिनिकल तपासणीवर आधारित असते, ज्यात न्यूरोलॉजिकल तपासणी, DaTscan इमेजिंग, आणि लेव्होडोपा चॅलेंज टेस्टचा समावेश असतो.

लवकर कृतीतून चांगले भविष्य

पार्किन्सन हा फक्त हालचालींचा आजार नाही. सुमारे ९०% रुग्णांमध्ये मूड बदल, थकवा, बद्धकोष्ठता, आणि झोपेचे विकार ही लक्षणे कंप सुरू होण्यापूर्वी दिसतात, आणि काही रुग्णांमध्ये कंप कधीच दिसत नाही. आज पार्किन्सन हा व्यवस्थित नियंत्रणात ठेवता येणारा आजार आहे. लेव्होडोपासारखे उपचार ही लक्षणे नियंत्रित ठेवतात आणि सक्रिय, स्वावलंबी जीवन जगण्यास मदत करतात. डीप ब्रेन स्टिम्युलेशन (DBS), MRgFUS आणि अपोमॉर्फिन इन्फ्युजन पंप यांसारखे प्रगत उपचार पर्याय आता भारतात उपलब्ध आहेत आणि काही काळजीपूर्वक निवडलेल्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

Web Title: Experts have provided important information about parkinsons disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • Doctor
  • Doctors News
  • Hospital

संबंधित बातम्या

MBBS doctors latest News : MBBS डॉक्टरांसाठी मोठा दिलासा! राज्य सरकारने अखेर रद्द केला ‘हा’ महत्त्वाचा नियम
1

MBBS doctors latest News : MBBS डॉक्टरांसाठी मोठा दिलासा! राज्य सरकारने अखेर रद्द केला ‘हा’ महत्त्वाचा नियम

Quintuplets Birth: क्वेटा येथील रुग्णालयात अद्भुत चमत्कार! एकाच वेळी जन्मली 5 बाळे; वैद्यकीय क्षेत्रात कौतुकाचा वर्षाव, VIDEO
2

Quintuplets Birth: क्वेटा येथील रुग्णालयात अद्भुत चमत्कार! एकाच वेळी जन्मली 5 बाळे; वैद्यकीय क्षेत्रात कौतुकाचा वर्षाव, VIDEO

उच्च रक्तदाब, मधुमेह अन् लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
3

उच्च रक्तदाब, मधुमेह अन् लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
4

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.