Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Hospital News: सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले ‘कृष्ण’ लॉकेट, डॉक्टरांनी एंडोस्कोपीतून वाचवला जीव

रक्षाबंधनाच्या सजावटीतील कृष्णाच्या मोरपंख असलेले धातूचे लॉकेट गिळल्याने सात महिन्यांच्या चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण झाला. अन्ननलिकेत अडकलेले लॉकेट डॉक्टरांनी तातडीने एंडोस्कोपी करून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2026 | 11:40 AM
सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले ‘कृष्ण’ लॉकेट, डॉक्टरांनी एंडोस्कोपीतून वाचवला जीव

सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले ‘कृष्ण’ लॉकेट, डॉक्टरांनी एंडोस्कोपीतून वाचवला जीव

Follow Us
Follow Us:
  • शताब्दी रुग्णालयात एंडोस्कोपी करून सुरक्षित बाहेर काढले
  • सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले ‘कृष्ण’ लॉकेट
  • डॉक्टरांनी एंडोस्कोपीतून वाचवला जीव
राम खांदारे, मुंबई : रक्षाबंधन सजावटीच्या साहित्यामुळे सात महिन्यांच्या चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. कृष्णाच्या मोरपंख असलेल्या छोट्या धातूच्या लॉकेटपैकी एक लॉकेट मुलाने गिळल्याने कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने पालिकेच्या शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने एंडोस्कोपी करून ते सुखरूप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार सात वर्षाचा आरोहित गुप्ता हा आई-वडील बाहेर गेले असल्याने आत्या जवळ होता. घरात राख्या तयार करण्याचे काम सुरू असल्याने मणी, धागे आणि सजावटीचे छोटे धातूचे तुकडे विखुरलेले होते. याचदरम्यान चिमुकल्याने कृष्णाची प्रतिमा असलेले दोन छोटे लॉकेट तोंडात टाकले. एक लॉकेट लगेच बाहेर काढण्यात आले; मात्र दुसरे सापडत नसल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक्स-रेमध्ये लॉकेट अन्ननलिकेच्या वरच्या भागात अडकले असल्याचे स्पष्ट झाले.

‘भारताला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले’; मुख्यमंत्र्यांचं गौरोद्गार

ईएनटी तज्ज्ञ डॉ. दिलेश मोगरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच भूलतज्ज्ञ डॉ. पूनम यांच्या मदतीने जनरल अ‍ॅनेस्थेशियाखाली एंडोस्कोपी केली. तपासणीदरम्यान मोरपंख असलेले कृष्णाचे लॉकेट अडकलेले दिसून आले. डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक ते बाहेर काढले. संपूर्ण प्रक्रिया यशस्वी ठरली असून मुलाची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या आसपास लहान सजावटीच्या वस्तू किंवा धातूचे साहित्य विखुरलेले ठेवू नये, असा इशाराही वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

‘लहान मुले अत्यंत कुतूहलपूर्ण असल्याने मोठ्यांच्या दुर्लक्षामुळे अपघात घडू शकतात. त्यामुळे पालकांनी व कुटुंबीयांनी लहान वस्तू, सजावटीचे साहित्य किंवा धातूचे तुकडे मुलांपासून लांब ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणात वेळेत निदान आणि एंडोस्कोपिक उपचार झाल्यामुळे मोठा धोका टळला.’अशी माहिती शताब्दी कांदिवली रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी माहिती दिली.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पीटल येथे अत्याधुनिक ‘हाय-एंड व्हेसल सीलर’ (Vessel Sealer) उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे शस्त्रक्रियांच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा मिळणार आहेत. या सीएसआर प्रकल्पांतर्गत दोन प्रगत इलेक्ट्रोसर्जिकल युनिट्स जनरल सर्जरी विभागासाठी ‘इलेक्टिव्ह सर्जरी ओटी’ जमेशदजी मेहता शस्त्रक्रिया कक्षामध्ये बसविण्यात आले आहेत.

ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्यायला हवे! खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश

Web Title: Rakshabandhan decoration locket swallowed child endoscopy life saved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Hospital
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
1

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली
2

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
3

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
4

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.