Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Facial Icing: चेहऱ्यावर बर्फ लावणे खरोखर फायदेशीर की फक्त ट्रेंड? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Facial Icing Benefits and Disadvantage: सोशल मीडियावर फेशियल आयसिंगचा ट्रेंड वाढत असून अनेक सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स ते स्किनकेअर रूटीनचा भाग बनवत आहेत. योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात केल्यास याचे फायदे दिसतात, मात्र प्रत्येकासाठी हा उपाय सुरक्षित असेलच असे तज्ज्ञांचे मत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 03, 2026 | 06:18 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • चेहऱ्यावर बर्फ लावणे फायदेशीर आहे का?
  • फेशियल आयसिंगचे फायदे
  • फेशियल आयसिंगचे संभाव्य तोटे
सोशल मीडियावर चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा म्हणजेच फेशियल आयसिंग मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर्स सकाळच्या स्किनकेअर रूटीनमध्ये या पद्धतीचा समावेश करतात. यामुळे त्वचेवर तात्पुरता ग्लो येतो, सूज कमी झाल्यासारखी वाटते आणि चेहरा फ्रेश दिसतो. मात्र, हा उपाय प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणातच फेशियल आयसिंग करणे सुरक्षित ठरते.

Dengue: पावसाळ्यात वाढतो डेंग्यूचा धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; जाणून घ्या

फेशियल आयसिंगचे फायदे

थंड तापमानामुळे चेहऱ्यावरील सूज आणि ब्लोटिंग काही काळासाठी कमी होण्यास मदत होते. विशेषतः डोळ्यांखालील सूज कमी झाल्यासारखी दिसते. तसेच त्वचेला ताजेपणा मिळतो, लालसरपणा आणि सौम्य इन्फ्लेमेशन कमी होऊ शकतो. मेकअप करण्यापूर्वी आयसिंग केल्यास त्वचा अधिक सॉफ्ट दिसण्यास मदत होऊ शकते.

फक्त तात्पुरता परिणाम मिळतो

फेशियल आयसिंगमुळे मिळणारे बहुतांश फायदे तात्पुरते असतात. यामुळे त्वचेच्या मूळ समस्या जसे की मुरुम, डाग, सुरकुत्या किंवा मोठी पोअर्स कायमस्वरूपी कमी होत नाहीत. त्यामुळे हा उपाय नियमित स्किनकेअर किंवा वैद्यकीय उपचारांचा पर्याय ठरू शकत नाही.

फेशियल आयसिंगचे संभाव्य तोटे

बर्फ थेट त्वचेवर लावल्यास त्वचा कोरडी पडणे, लालसरपणा, जळजळ किंवा त्वचेच्या बॅरिअरला इजा होण्याचा धोका असतो. संवेदनशील त्वचा, रोझेशिया किंवा एक्झिमाची समस्या असलेल्या व्यक्तींनी हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

फेशियल आयसिंगची योग्य पद्धत

  • बर्फ कधीही थेट चेहऱ्यावर लावू नका.
  • बर्फ स्वच्छ सूती कापडात गुंडाळून वापरा.
  • एका जागी जास्त वेळ बर्फ ठेवू नका.
  • 2 ते 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बर्फ लावू नये.
  • आयसिंगनंतर मॉइश्चरायझर लावून त्वचा हायड्रेट ठेवा.

कोणी फेशियल आयसिंग टाळावे?

अतिसंवेदनशील त्वचा, रोझेशिया, एक्झिमा, कोल्ड अॅलर्जी किंवा त्वचेवर जखम असलेल्या व्यक्तींनी फेशियल आयसिंग टाळावे. अशा परिस्थितीत हा उपाय फायदेशीर ठरण्याऐवजी त्वचेची समस्या वाढवू शकतो. कोणतीही शंका असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे.

फेशियल आयसिंग हा त्वचेला तात्पुरता ताजेपणा देणारा उपाय असू शकतो. मात्र, त्याचा अतिरेक किंवा चुकीची पद्धत त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे हा ट्रेंड आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि योग्य काळजी घेऊनच वापरणे अधिक योग्य ठरेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Monsoon Skin Care: पावसाळ्यातही सनस्क्रीन का लावावे? जाणून घ्या महत्त्वाची कारणे

Web Title: Facial icing benefits side effects skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • how to get glowing skin
  • oily skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

सेलिब्रिटींमध्ये का फेमस Ice Water Facial? चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल
1

सेलिब्रिटींमध्ये का फेमस Ice Water Facial? चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
2

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Skin Care च्या नावाखाली केलेली एक चूक त्वचेसाठी ठरेल घातक! ‘या’ लोकांनी चुकूनही लावू नका फेसपॅक
3

Skin Care च्या नावाखाली केलेली एक चूक त्वचेसाठी ठरेल घातक! ‘या’ लोकांनी चुकूनही लावू नका फेसपॅक

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
4

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.