Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: मातेच्या गर्भातच थांबवला मृत्यूचा धोका! वाडियात आईला औषधे देत बाळाच्या हृदयातील गाठींवर उपचार

गर्भातील बाळाच्या हृदयातील रक्तप्रवाहावर गंभीर परिणाम करणाऱ्या गाठींवर आईमार्फत औषधोपचार करणे ही अत्यंत दुर्मीळ आणि आव्हानात्मक प्रक्रिया आहे. वेळेवर निदान आणि सातत्यपूर्ण देखरेख यामुळे आम्ही संभाव्य जीवितहानी टाळू शकतोे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2026 | 08:40 AM
मातेच्या गर्भातच थांबवला मृत्यूचा धोका! वाडियात आईला औषधे देत बाळाच्या हृदयातील गाठींवर उपचार

मातेच्या गर्भातच थांबवला मृत्यूचा धोका! वाडियात आईला औषधे देत बाळाच्या हृदयातील गाठींवर उपचार

Follow Us
Follow Us:

वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत मुंबईतील बाई जेरबाई वाडिया आणि नौरोजी वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भातील बाळाच्या हृदयात निर्माण झालेल्या जीवघेण्या गाठींवर आईच्या गर्भात असतानाच यशस्वी उपचार केले. या दुर्मिळ हस्तक्षेपामुळे जन्मापूर्वीच निर्माण झालेला गंभीर धोका टळून बाळाचा सुरक्षित व निरोगी जन्म झाला आहे. २४ आठवड्यांच्या गर्भधारणेदरम्यान नियमित तपासणीत डॉ. पूजा बांदेकर आणि डॉ. वंदना बन्सल यांच्या टीमला गर्भातील बाळाच्या हृदयात अनेक गाठी आढळल्या. त्यानंतर डॉ. श्रीपाल जैन यांनी फिटल इकोकार्डिओग्राफीद्वारे सखोल तपासणी केली.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

तासंतास लघवी रोखून धरता? चुकीच्या सवयींमुळे महिलांना होऊ शकते ‘या’ गंभीर आजारांची लागण, वेळीच व्हा सावध

तपासणीत या गाठी हृदयातून रक्तप्रवाहाच्या दोन्ही प्रमुख मार्गांमध्ये अडथळा निर्माण करत असल्याचे दिसून आले. उपचार न केल्यास गर्भातील बाळाला हृदयविकाराचा झटका येण्याचा किंवा जन्मापूर्वीच मृत्यू होण्याचा धोका होता. यावर डॉक्टरांनी आईला ‘एव्हरोलिमस’ हे औषध देण्याचा निर्णय घेतला.

ही अत्यंत दुर्मीळ आणि आव्हानात्मक प्रक्रिया

कर्करोग आणि लहान मुलांमधील अशा गाठींवर वापरले जाणारे हे औषध गर्भातील बाळावरील गाठी कमी करण्यासाठी देण्याची प्रकरणे जगभरात अत्यंत दुर्मिळ आहेत. औषधोपचारादरम्यान आई आणि गर्भातील बाळावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. काही आठवड्यांतच गाठींचा आकार लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले.परिणामी गर्भधारणा सुरक्षितपणे पूर्ण कालावधीपर्यंत नेणे शक्य झाले. यावर डॉ. श्रीपाल जैन म्हणाले, ‘गर्भातील बाळाच्या हृदयातील रक्तप्रवाहावर गंभीर परिणाम करणाऱ्या गाठींवर आईमार्फत औषधोपचार करणे ही अत्यंत दुर्मीळ आणि आव्हानात्मक प्रक्रिया आहे. वेळेवर निदान आणि सातत्यपूर्ण देखरेख यामुळे आम्ही संभाव्य जीवितहानी टाळू शकलो.

Yoga: सकाळची सुरुवात योगाने करा; शरीर आणि मनाला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, ‘हे प्रकरण गर्भातील गंभीर आजारांवर अनेक वैद्यकीय दृष्टिकोन किती प्रभावी ठरू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. योग्य वेळी निदान आणि आधुनिक उपचारपद्धतीमुळे अशक्य वाटणाऱ्या आव्हानांवरही मात करता येते.’ मुंबईतील अशा प्रकारचे हे पहिले यशस्वी प्रकरण मानले जात असून, गर्भातील हृदयविकार उपचार क्षेत्रासाठी ते महत्वपूर्ण मानले जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Fatal risk averted in the womb baby treated for heart tumors by administering medication to the mother at wadia hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • health care news
  • Health Updates
  • Pregnant Issue

संबंधित बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…
1

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; ICU मध्ये उपचार सुरू
2

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; ICU मध्ये उपचार सुरू

‘टीबीमुक्त भारत’चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक
3

‘टीबीमुक्त भारत’चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ
4

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.