
उन्हाळ्यात वाटेल कायमच फ्रेश! झाडूसारख्या केसांवर नियमित लावा गुलाब पाणी, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसंबधीत असंख्य समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग. कोरडी त्वचा, केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा इत्यादी अनेक समस्या वाढून केसांचे नुकसान होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त वेळ उन्हात बाहेर फिरल्यास त्वचा काळी होण्यासोबतच चेहऱ्यावर अतिरिक्त तेल वाढते. तसेच केसांवर सुद्धा परिणाम दिसून येतो. केस कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. अशावेळी महिलांसह पुरुषसुद्धा वेगवेगळे हेअर शाम्पू, हेअर सिरम तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे काहीकाळ केस सुंदर दिसतात. पण कालांतराने पुन्हा एकदा केस खराब होऊन जातात. वारंवार केसांवर केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्यास केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. चला तर जाणून घेऊया कोरड्या केसांवर गुलाब पाण्याचा वापर कसा करावा.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे टाळूवर खूप जास्त खाज येते आणि काहीवेळा केसांमध्येब कोंडा होण्याची शक्यता असते. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण सतत केमिकल प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करावेत. टाळूवर वाढलेली खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी केसांना गुलाब पाणी लावावे. गुलाब पाणी केसांवर लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज केल्यास रक्तभिसरण सुधारण्यासोबतच टाळूवर वाढलेला कोरडेपणा कमी होईल आणि केस चमकदार दिसतील.
गुलाब पाण्याचा वापर केवळ केस आणि त्वचेसाठी सुद्धा केला जातो. तापमानात वाढ झाल्यानंतर त्वचेवर पिंपल्स किंवा उष्णता वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे चेहऱ्यावर जळजळ वाढते. अशावेळी चेहऱ्यावर गुलाब पाणी लावावे. गुलाब पाणी लावल्यामुळे त्वचा फ्रेश आणि ताज़ीटवटवीत राहण्यास मदत होते. वाटीमध्ये मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र मिक्स करून फेसपॅक तयार करावा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा आणि त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका. मुलतानी मातीचा फेसपॅक लावल्यामुळे त्वचेवर वाढलेली डेड स्किन कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार होईल.
गुलाब पाण्याचा वापर तुम्ही टोनर म्हणून सुद्धा करू शकता. मेकअप करण्याच्या आधी किंवा कुठेही बाहेर जाताना गुलाब पाणी टोनर म्हणून चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळेल आणि त्वचेवर ग्लो कायम टिकून राहील. याशिवाय त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. त्वचा आणि केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुलाब पाणी खूप जास्त प्रभावी ठरते.