चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या दूर! स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणाऱ्या मसूर डाळीचा 'या' पद्धतीने करा वापर
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उन्हाचा तडाखा वाढला आहे. कडक ऊन आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासोबतच त्वचेसंबंधित समस्या सुद्धा उद्भवू लागतात. कडक उन्हात जास्त वेळ बाहेर गेल्यामुळे त्वचा टॅन होऊन जाते. चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, मुरूम, पुरळ आणि त्वचेच्या समस्या वाढू लागतात. याशिवाय काहीवेळा उन्हामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट करून टाकतात. त्यामुळे वयापेक्षा जास्त खूप जास्त वयस्कर दिसू लागते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. तर काहीवेळा फेसपॅक, फेसमास्क, फेशिअल करून त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण वारंवार केमिकल ट्रीटमेंट आणि प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा सुकल्यासारखी वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
मसूर डाळीचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. मसूर डाळ सहज पचन होते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आहारात मसूर डाळीचा समावेश करावा. मसूर डाळीचा वापर जेवण बनवण्यसाठीच नाहीतर त्वचेसाठी सुद्धा केला जातो. मसूर डाळ त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. या डाळीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर ग्लो वाढतो, टॅनिंग कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर आलेले काळे डाग नष्ट होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी मसूर डाळीचा फेसपॅक तयार करून आठवड्यातून दोनदा लावल्यास सकारात्मक बदल त्वचेमध्ये दिसून येतील.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ घेऊन बारीक पावडर तयार करा. तयार केलेली पावडर काचेच्या डब्यात ठेवल्यास लवकर खराब होणार नाही. वाटीमध्ये तयार केलेली मसूर डाळ पावडर, हळद, मुलतानी माती आणि दूध घालून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती स्वच्छ होण्यासोबतच टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उजळदात दिसेल.
वाटीमध्ये दूध घेऊन त्यात केशर काड्या घाला आणि काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर त्यात जायफळ पावडर टाकून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि नंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी केशराचा वापर करावा. या फेसपॅकच्या वापरामुळे डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा तेजस्वी दिसेल.






