Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडलं आहे? कोमट पाण्यात मिक्स करून प्या ‘ही’ हिरवी पावडर, बद्धकोष्ठता- अपचनचा त्रास होईल कमी

वाढलेले वजन आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी शेवग्याच्या पावडरचे सेवन करावे. कोमट पाण्यात मोरिंगा पावडर मिक्स करून प्यायल्यास आठवडाभरात फरक दिसून येईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2026 | 08:03 AM
शरीरातील विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडलं आहे? कोमट पाण्यात मिक्स करून प्या 'ही' हिरवी पावडर, बद्धकोष्ठता- अपचनचा त्रास होईल कमी

शरीरातील विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडलं आहे? कोमट पाण्यात मिक्स करून प्या 'ही' हिरवी पावडर, बद्धकोष्ठता- अपचनचा त्रास होईल कमी

Follow Us
Follow Us:

शेवग्याच्या पानांचे फायदे?
शेवग्याच्या पावडरचे कशा पद्धतीने सेवन करावे?
वजन कमी करण्यासाठी उपाय?

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे शरीरसंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, गॅस तर काहीवेळा शरीराला गंभीर आजारांची लागण सुद्धा होते. आतड्यांमध्ये विषारी घटक साचून राहिल्यामुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. हे विषारी घटक फॅटी लिव्हर किंवा शरीरसंबंधित इतर आजार निर्माण करतात. त्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कोमट पाण्यात शेवग्याच्या शेंगांची पावडर मिक्स करून प्यायल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार

शेवग्याच्या शेंगा सुपरफूड म्हणून ओळखल्या जातात. भारतीय घरांमध्ये आवर्जून शेवग्याच्या शेंगांचे सेवन केले जाते.पोटात वाढलेला जडपणा किंवा अपचन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात अर्धा चमचा शेवग्याच्या शेंगांची पावडर मिक्स करून प्यायल्यास जुनाट बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या सर्व त्रासांपासून कायमची सुटका मिळेल. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. नियमित संपूर्ण शरीर डिटॉक्स होणे फार आवश्यक आहे. अन्यथा आजारपण वाढून संपूर्ण आरोग्य बिघडून जाते.

शेवग्याच्या शेंगांमधील आवश्यक पोषक घटक:

शेवग्याच्या शेंगा किंवा पाने शरीरासाठी खजिना आहेत. या पानांमध्ये विटामिन ए, सी, ई, विटामिन बी, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा शेवग्याच्या पानांना विशेष महत्व आहे. यामध्ये नऊ अत्यावश्यक अमिनो अ‍ॅसिड्स असतात, ज्यामुळे कम्प्लीट प्रोटीनचा दर्जा शरीराला मिळतो. याशिवाय शेवग्याच्या शेंगांमध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आणि आयसोथियोसायनेट्स नावाचे घटक असतात. यामुळे शरीराला आतून आलेली सूज कमी होते आणि आरोग्य सुधारते.

Morning Headache: रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास? दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय ‘हे’ संकेत

वजन कमी करण्यासाठी प्रभावी:

वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे तर काहीवेळा सप्लिमेंट्सचे सुद्धा सेवन केले जाते. पण यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. अशावेळी नियमित कोमट पाण्यात शेवग्याच्या पानांची पावडर मिक्स करून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यामध्ये असलेले आयसोथियोसायनेट्स शरीरात नवीन चरबीच्या पेशी तयार करण्याचा वेग कमी करतात. तसेच रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे सेवन केले जाते. शरीरातील जुनाट सूज कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बद्धकोष्ठता आणि अपचन कमी करण्यासाठी हिरवी पावडर उपयुक्त ठरते का?

    Ans: काही हिरव्या पावडरींमध्ये फायबर असल्याने काही लोकांमध्ये पचन सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा असू शकतो आणि ती उपचारांचा पर्याय नाही.

  • Que: हिरवी पावडर कोणाला टाळावी?

    Ans: गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला, दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण, रक्त पातळ करणारी औषधे घेणारे किंवा इतर औषधे नियमित घेत असलेले व्यक्तींनी कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Que: पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सवयी महत्त्वाच्या आहेत?

    Ans: पुरेसे पाणी पिणे, तंतुमय आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, फळे-भाज्यांचा समावेश करणे, वेळेवर जेवणे आणि प्रक्रिया केलेले अन्न कमी खाणे या सवयी पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

Web Title: Feeling bloated and sluggish mix this green powder with warm water to help ease constipation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • constipation
  • Moringa
  • Weight loss

संबंधित बातम्या

पोटात कायमच जडपणा जाणवतो? आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी घरीच तयार करा आयुर्वेदिक चूर्ण, बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम
1

पोटात कायमच जडपणा जाणवतो? आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी घरीच तयार करा आयुर्वेदिक चूर्ण, बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

मधुमेहापासून ते अगदी वाढलेले वजन कमी करण्यापर्यंत दालचिनी ठरेल खूप जास्त गुणकारी, जाणून घ्या फायदे
2

मधुमेहापासून ते अगदी वाढलेले वजन कमी करण्यापर्यंत दालचिनी ठरेल खूप जास्त गुणकारी, जाणून घ्या फायदे

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी
3

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.