Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटत? थकवा नसून असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, वेळीच व्हा सावध

सतत चक्कर येत असल्यास दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. कारण स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी डोळ्यांसमोर अंधारी किंवा चक्कर आल्यासारखे वाटते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 11, 2026 | 08:21 AM
अचानक चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटत? थकवा नसून असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत, वेळीच व्हा सावध

अचानक चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटत? थकवा नसून असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत, वेळीच व्हा सावध

Follow Us
Follow Us:

अचानक चक्कर येण्यामागील कारणे?
चक्कर आल्यानंतर कोणते उपाय करावे?
स्ट्रोक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?

कामाच्या धावपळीमध्ये विश्रांती घेण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेला मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप तर कामाच्या वाढलेल्या व्यापामुळे शांत झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे कायमच चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चक्कर आल्यानंतर सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार तुम्हाला चक्कर येत असेल, तर हे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहेत. मेंदूला आवश्यक प्रमाणात रक्तपुरवठा, ऑक्सिजन किंवा साखर न मिळाल्यामुळे शरीराचा समतोल बिघडून जातो आणि वारंवार चक्कर येण्यास सुरुवात होते. याशिवाय डिहायड्रेशन, कमी रक्तदाब, मधुमेह, तणाव, तसेच कानातील ‘व्हर्टिगो’ यांसारख्या समस्यांमुळे सुद्धा चक्कर येते.(फोटो सौजन्य – istock)

World Parkinson’s Day निमित्त पार्किन्सन्सबाबत जागरूकतेचे आवाहन; १ कोटींहून अधिक लोक प्रभावित

झोपेतून अचानक उठल्यानंतर, जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे किंवा वाढत्या उष्णतेमुळे सुद्धा चक्कर येते. तर बऱ्याचदा स्टोक आणि हार्ट अटॅकसंबंधित लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर गरगारल्यासारखे वाटणे किंवा कोणत्याही क्षणी चक्कर येऊन शरीराचा रक्तपुरवठा थांबतो. त्यामुळे वारंवार येणाऱ्या चक्करकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या कारणामुळे सतत चक्कर येते? चक्कर कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

डिहायड्रेशन:

चक्कर येणे म्हणजे डोकं दुखणे किंवा भोवळ येणे नाही, तर शरीराचा समतोल बिघडल्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन, रक्तपुरवठा होत नाही. ज्यावेळी शरीराला आवश्यक रक्तपुरवठा होत नाही तेव्हा मेंदू बॅकअप मोडवर जातो, ज्यामुळे कोणत्याही क्षणी चक्कर येते किंवा डोळ्यांवर अंधारी आल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे नेमकी कशामुळे चक्कर येते हे ओळखणं फार आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर रक्ताची पातळी सुद्धा कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे मेंदूला आवश्यक रक्तपुरवठा होत नाही. तोंड कोरडे पडणे, लघवी गडद होणे किंवा खूप जास्त थकवा आल्यासारखे वाटू लागते.

कमी रक्तदाब:

बऱ्याचदा एका जागी बसल्यानंतर किंवा अचानक झोपेतून उठल्यानंतर चक्कर आल्यासारखे वाटते. चक्कर आल्यानंतर काहीवेळा डोळ्यांसमोर अंधारी येते आणि समोर काय आहे, हे लवकर समजून येत नाही. शरीराचा रक्तदाब कमी झाल्यानंतर आणि गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायांकडे खेचले गेल्यामुळे हृदयाला ते मेंदूपर्यंत पोहचवण्यासाठी सेकंद भराचा उशीर होतो, ज्याच्या परिणामामुळे मेंदूला किंवा हृदयाला हानी पोहचण्याची शक्यता असते. मिठाचे कमी प्रमाण, हृदयविकार किंवा काही औषधांचा दुष्परिणाम झाल्यामुळे रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते.

6 आयुर्वेदिक उपाय, दातदुखीवर रामबाण; Oil Pulling पासून लवंग, हळद-मुलेठी दातांना देईल मजबूती

चक्कर आल्यानंतर कोणते उपाय करावेत:

अचानक चक्कर आल्यानंतर एका जागेवर शांत बसून पाणी प्यावे. याशिवाय उष्णतेच्या ठिकाणी न बसता थंड हवेच्या ठिकाणी बसून राहावे. चक्करसोबतच तुम्हाला बोलताना तोतरे होणे, अर्धांगवायूचा भास होणे किंवा छातीत दुखल्यासारखे वाटल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे. कारण हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आल्यानंतर वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चक्कर येणे ही केवळ सामान्य समस्या नसून शरीरसंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहेत. त्यामुळे शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी पिणे, संतुलित आहार, व्यायाम इत्यादी गोष्टी केल्यास आरोग्य निरोगी राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अचानक चक्कर येणे म्हणजे काय?

    Ans: अचानक चक्कर येणे म्हणजे डोके हलके वाटणे, गरगरल्यासारखे वाटणे किंवा संतुलन बिघडणे.

  • Que: चक्कर येण्याची मुख्य कारणे कोणती?

    Ans: लो ब्लड प्रेशर, रक्तक्षय (अॅनिमिया), डिहायड्रेशन, व्हर्टिगो, मेंदू किंवा कानाशी संबंधित समस्या ही सामान्य कारणे असू शकतात.

  • Que: थकवा नसतानाही चक्कर का येते?

    Ans: हे शरीरातील पाण्याची कमतरता, रक्तदाबातील बदल किंवा न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे होऊ शकते.

Web Title: Feeling dizzy all of a sudden fatigue may not be a sign of serious illness be careful in time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • heart attack reason
  • Stroke

संबंधित बातम्या

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
1

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
2

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
3

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
4

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.