Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fever Care Tips: ताप आल्यावर अंघोळ करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Taking Shower In Fever Right or Wrong: ताप आल्यावर रुग्णाने अंघोळ करावी की नाही, याचा शरीरावर कया परिणाम होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 27, 2026 | 07:45 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • तापात आंघोळ करणे योग्य की अयोग्य?
  • जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
  • थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा
सर्दी, ताप किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर अनेक जण अंघोळ करण्याचे टाळतात. तापात अंघोळ केली तर ताप वाढतो किंवा अंघोळ केल्याने प्रकृती आणखी बिघडते अशा अनेक समजुती ऐकायला मिळतात. खरं म्हणजे, तापाच्या वेळी अंघोळ करावी की नाही, हे तापाची तीव्रता, रुग्णाची शारीरिक अवस्था आणि आंघोळीची पद्धत यावर अवलंबून असते. ताप असताना अंघोळ करावी की नाही, जाणून घेऊयात.

Health Tips: दररोज तूप खाताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

तापात अंघोळ करणे पूर्णपणे चुकीचे नाही

ताप असल्यावर, रुग्णाला चालणे-फिरणे शक्य असेल आणि अशक्तपणा फार जाणवत नसेल, तर कोमट पाण्याने अंघोळ करता येते. त्यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि घामामुळे होणारा चिकटपणाही कमी होतो.

थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा

तापाच्या वेळी थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे. थंड पाण्यामुळे शरीराला अचानक थंडी वाजू शकते, ज्यामुळे अस्वस्थता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी कोमट किंवा शरीराच्या तापमानाच्या जवळपास असलेल्या पाण्याचा वापर करणे अधिक योग्य मानले जाते.

अंघोळ फार वेळ करू नका

तापात दीर्घकाळ बाथरूममध्ये राहणे टाळावे. कमी वेळात अंघोळ करून शरीर लगेच कोरडे करावे. त्यानंतर कोरडे आणि आरामदायी कपडे घालून विश्रांती घ्यावी. ओल्या केसांसह किंवा ओल्या कपड्यांत बसणे योग्य नाही.

अशक्तपणा जाणवत असेल तर काळजी घ्या

तापामुळे चक्कर येत असेल, खूप अशक्त वाटत असेल किंवा उभे राहण्यास त्रास होत असेल, तर अंघोळ करू नये. अशावेळी कोमट पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने शरीर पुसणे हा अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

या गोष्टींकडेही दुर्लक्ष करू नका

तापाच्या काळात भरपूर पाणी पिणे, हलका आणि पौष्टिक आहार घेणे तसेच पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. ताप सतत वाढत असेल, तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास, सतत उलट्या किंवा तीव्र अशक्तपणा जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Girls Fear Lizards:  मोठमोठ्या संकटांना न घाबरणाऱ्या मुली पाल पाहताच का किंचाळतात? यामागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण

Web Title: Fever care tips can you bathe during fever doctor advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • cold and cough home remedies
  • health awareness
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
3

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.