वाढलेले वजन व्यायामाशिवाय कसे कमी करावे
2024 हे वर्ष संपण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. येणाऱ्या 2025 या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताची सगळीकडे जोरदार तयारी सुरु आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. शिवाय नवीन वर्षाच्या पाहिल्याचं दिवशी विविध संकल्प केले जातात. त्यामध्ये काही लोक वाढलेले वजन कमी करण्याचा संकल्प करतात. त्यानंतर वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र काहीकाळच या गोष्टी फॉलो केल्या जातात आणि पुन्हा व्यायाम करण्याचा कंटाळा केला जातो. मात्र असे केल्यास वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आणखीन वाढण्याची शक्यता असते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करण्याची आवश्यकता असते.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. वजन कमी झाले नाहीतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्या वाढू लागल्यानंतर आरोग्याचे आणखीनच नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन व्यायामाशिवाय कसे कमी करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
वजन कमी वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करताना शरीर हायड्रेट राहणे आवश्यक आहे. शरीर हायड्रेट नसेल तर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. शिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोटावरील चरबी कमी होते. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे कोमट पाण्यासोबतच शरीर डिटॉक्स होण्यासुद्धा मदत होते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी, फळांचा रस, नारळ पाणी, ताक इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. पण असे केल्यामुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा, ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. सकाळच्या नाश्त्यामध्ये स्प्राउट्स, अंडी, चीज, दही, स्मूदी, सॅलड आणि नट्सचा समावेश करावा. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. या पदार्थांमध्ये कमी कॅलरीज असतात. आहारामध्ये प्रथिने आणि फायबरने समृद्ध असलेले पदार्थ खाल्यास भूक कमी होते.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नवीन वर्षात शरीराला योगासने करण्याची चांगली सवय लावावी. योगासने केल्यामुळे दैनंदिन जीवनात शरीराला अनेक फायदे होतात. शिवाय आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होते. योग केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय व्यायाम केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. योग केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.