Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमध्ये सुकलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, आतड्या होतील लगेच स्वच्छ

आतड्यांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात नियमित भरपूर पाणी प्यावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीराच्या कार्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: May 18, 2025 | 11:46 AM
बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमध्ये सुकलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी

बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमध्ये सुकलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी

Follow Us
Follow Us:

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्यातील अनेकांना बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सतत जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, कामाच्या वाढलेल्या तणावामुळे शरीराला हानी पोहचते. शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे पचनक्रिया बिघडण, गॅस होणे, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक योग्य वेळी बाहेर पडून न गेल्यामुळे शरीराला कोणत्याही आजारांची लागण होते. त्यामुळे नेहमी पोट स्वच्छ असणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर पॉट स्वच्छ झाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. मात्र बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यास सतत उलट्या, मळमळ वाटू लागते.(फोटो सौजन्य – iStock)

किडनी फेल झाल्यानंतर लघवीमध्ये दिसून येतात ‘हे’ गंभीर बदल, लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला

शरीरात वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यास जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीची जीवनशैली फॉलो न करता शरीरासाठी आवश्यक असलेली जीवनशैली फॉलो करावी. बद्धकोष्ठतेमुळे बऱ्याचदा आतड्यांमध्ये मल तसाच साचून राहतो. ज्यामुळे सतत पोटात दुखणे किंवा पोटात वेदना होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी शरीरात कोणते बदल करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

भरपूर पाणी प्यावे:

शरीर कायम हायड्रेट आणि स्वच्छ ठेवण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला कोणतीही इजा होत नाही. मात्र शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीर बिघडून जाते. पाण्याचे भरपूर सेवन केल्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचन इत्यादी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. याशिवाय आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.

हिंगाच्या पाण्याचे सेवन करावे:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल. हिंग पचनासाठी अतिशय महत्वाचे आहे. हिंगाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. यामुळे जेवणाची सुगंध वाढतो. हिंग शरीराच्या कान्याकोपऱ्यात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते.

पोटात साठून राहिलेला गॅस क्षणार्धात पडून जाईल बाहेर! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतील गुणकारी, पोट होईल स्वच्छ

फायबरयुक्त फळांचे सेवन:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचे भरपूर सेवन करावे. फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे आहारात तुम्ही पपई, सफरचंद, संत्री, नाशपाती, पेरू, किवी, मनुका आणि लिंबू इत्यादी फळांचे सेवन करू शकता. या फळांमध्ये भरपूर फायबर असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Follow these habits to flush out the dry dirt in the intestines due to constipation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • constipation home remedies
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
4

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.