Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायम तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, वयाच्या ८० व्या वर्षी राहाल फिट

दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायम निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर या सवयी फॉलो कराव्यात. यामुळे वयाच्या ८० मध्ये सुद्धा तुम्ही फिट राहाल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 15, 2025 | 11:31 AM
कायम तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

कायम तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Follow Us
Follow Us:

हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो., शरीरात वाढलेल्या शारीरिक आणि मानसिक तणावामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. यामुळे शरीर पूर्णपणे थकून जाते. जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, मानसिक तणाव, धूम्रपान इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरातील अर्जाची पातळी कमी झाल्यानंतर सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय वयाच्या पन्नाशीनंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांमुळे हाडं दुखणे, शरीरावर सुरकुत्या येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला कायम निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या सवयी फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

शरीरातील घाणीमुळे आतड्यांवरील आलेला तणाव कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, बद्धकोष्ठता होईल कायमची दूर

शारीरिक हालचाली करणे:

वयाच्या ६० नंतर बरीच लोक कायम घरातच बसून राहतात. शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण होतो. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरातील विषारी घटक तसेच आतड्यांमध्ये साचून राहतात. त्यामुळे नियमित व्यायाम, चालणे, सायकलिंग, ध्यान, प्राणायाम करणे आवश्यक आहे. नियमित चालल्यामुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. याशिवाय शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे दिवसभरातून नियमित ३० मिनिटं चालणे आवश्यक आहे. कार्डिओ केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते.

सकाळच्या वेळी पौष्टिक नाश्ता:

सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते, यासोबतच शरीरात थकवा अशक्तपणा जाणवत नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याची सुरुवात हलक्या पदार्थांचे सेवन करून करावी. हलके आणि पौष्टिक पदार्थ खाल्यास दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. तसेच आहारात प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नेहमीच पौष्टिक आणि आरोग्यदायी नाश्ता करावा.

अस्वस्थ मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित करा ‘हे’ प्राणायाम, हायपरटेंशनची समस्या होईल कायमची दूर

सकारात्मक दृष्टिकोन:

वाढत्या वयानुसार विचारांमध्ये सुद्धा अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. बिघडलेली मानसिक स्थिती सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित ध्यान किंवा प्राणायाम करावे. यामुळे मन शांत राहते आणि विचार करण्याची क्षमता वाढू लागते. याशिवाय मानसिक तणावातून सुटका मिळवण्यासाठी शांत झोप घेणे आवश्यक आहे. खराब झोपेमुळे आरोग्य बिघडून जाते. ध्यान किंवा योगासने केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा शरीरात कायम टिकून राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Follow these simple tips after waking up in the morning to stay fit and healthy forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • health
  • Health Care Tips
  • Healthy life

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
4

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.