अस्वस्थ मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित करा 'हे' प्राणायाम
बिघडलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. मानसिक तणाव वाढल्यानंतर मन अस्वस्थ होणे, काम करण्याची इच्छा न होणे, वारंवार डोकं दुखणे, सतत चिडचिड इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी नियमित सकाळी उठल्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करावे. सकाळी उठल्यानंतर नियमित प्राणायाम केल्यामुळे शरीरात सकारात्मक बदल दिसून येतात. श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम नियमित करावे. हे प्राणायाम तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे अनुलोम म्हणजे उजवी नाकपुडी, विलोम म्हणजे डावी नाकपुडी आणि प्राणायाम म्हणजे श्वास घेणे असा याचा अर्थ होतो. हे प्राणायाम करताना उजव्या आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यावा, त्यानंतर हळुवार श्वास सोडावा. अनुलोम विलोम प्राणायाम नियमित केल्यास शरीराचे शुद्धीकरण होते. यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. नाडी शोधन प्राणायाम केल्यामुळे शरीरातील नाड्या शुद्ध होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम नियमित केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीराच्या कार्यात बदल दिसून येतील.
सकाळी उठल्यानंतर शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित अनुलोम विलोम प्राणायाम करावे. शरीरात वाढलेला तणाव, बिघडलेली जीवनशैली, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा नकारात्मक परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शारीरिक दृष्ट्या शरीर सक्रिय ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, प्राणायाम, ध्यान करावे. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराच्या ऊर्जा वाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे वारंवार थकवा, आळस जाणवू लागतो. अशावेळी नियमित अनुलोम विलोम प्राणायाम केल्यास शरीरातील संपूर्ण थकवा आणि अशक्तपणा निघून जाईल. ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या उघडण्यास मदत होईल.
दुर्मिळ अस्थिसंसर्गाचे अखेर निदान, थॅलसेमियाच्या रुग्णाच्या हालचाली पूर्ववत होण्यास मदत