Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी चटपटीत किंवा कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही चना कोळीवाडा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय टेस्टी लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 01, 2026 | 10:19 AM
१० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

१० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Follow Us
Follow Us:

Food Recipe: खाण्याचा विषय निघाल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मुंबईच्या स्ट्रीटवर अनेक नवनवीन पदार्थ खाण्यास मिळतात. या पदार्थांची चव चाखण्यासाठी खव्व्य्ये लांबून मुंबईमध्ये येतात. त्यातील हॉटेलमध्ये मिळणारा सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चना कोळीवाडा. चकणा म्हणून हॉटेल किंवा ढाबावर गेल्यानंतर आवर्जून चना कोळीवाडा मागवला जातो. खमंग आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर हमखास तुम्ही चना कोळीवाडा बनवून खाऊ शकता. कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्याची अजिबात आवश्यकता नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही झटपट चना कोळीवाडा बनवू शकता. काबोली चणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतात. स्नॅक्समध्ये किंवा मुलांना चटपटीत काहींना काही खाण्याची इच्छा झाल्यानंतर विकतचे पदार्थ आणून खाण्यास देण्याऐवजी या पद्धतीने बनवलेले चना कोळीवाडा खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

साहित्य:

  • काबुली चणे
  • मोहरीचे तेल
  • हळद
  • लाल तिखट
  • मीठ
  • धणे जिरं पावडर
  • आलं लसूण पेस्ट
  • कॉर्नफ्लोर
  • बेसन
  • लसूण पाकळ्या
  • हिरवी मिरची
Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

कृती:

  • ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर काबुली चणे घेऊन आधल्या दिवशी भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी चणे भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.
  • कुकरमध्ये भिजवलेले चणे, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावा आणि कुकरच्या २ किंवा ३ शिट्ट्या काढून घ्या.
  • वाटीमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यात हळद, धणे पावडर, जिरं पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, आले-लसूण- हिरवी मिरचीची पेस्ट घालून सर्व मसाले एकत्र मिक्स करा.
  • त्यानंतर मसाल्यांमध्ये कॉर्नफ्लोर आणि बेसन घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना कॉर्नफ्लोर एक किंवा दीड चमचा टाकावे. जास्त टाकू नये.
  • शिजवून घेतलेले चणे तयार केलेल्या मसाल्यांमध्ये टाकून हलक्या हाताने मिक्स करून घ्या. मिश्रणात जास्त पाणी घालू नये.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. चणे अलगद तेलामध्ये सोडा आणि त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या टाकून चणे मंद आचेवर तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा. हा पदार्थ चकणा म्हणून सुद्धा खाल्ला जातो.

Web Title: Food recipe how to make crispy chana koliwada at home simple food recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
1

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
2

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
3

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
4

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.