Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Pitru Paksha: आज आम्ही तुम्हाला मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने अख्ख्या गव्हाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. गव्हाची खीर चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2026 | 10:41 AM
पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, 'या' टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, 'या' टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Follow Us
Follow Us:

Pitru Paksha: भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची सुरुवात झाल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली जाते. हा काळ पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी अतिशय पवित्र मानला जातो. श्रद्धाच्या दिवशी पूर्वजांच्या आवडीचे सात्त्विक आणि पारंपरिक पदार्थ बनवले जातात. यामध्ये तांदळाची खीर, गव्हाची खीर, वडे, मिक्स भाज्या, डाळभात इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये नैवेद्यासाठी खपली गव्हाची खीर बनवली जाते. पारंपारिक चवीची खीर शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. गहू शिजवून त्यात दूध आणि गूळ घालून तयार केलेली खीर चवीला अतिशय सुंदर लागते. पण बऱ्याचदा दूध टाकल्यानंतर खीर फुटून जाईल अशी भीती मनात कायमच निर्माण होते. गव्हाची खीर प्रामुख्याने राठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आवर्जून बनवली जाते. महाप्रसादात किंवा श्राद्धाच्या जेवणात बनवल्या जाणाऱ्या पदार्थाना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

साहित्य:

  • गहू
  • गूळ
  • दूध
  • वेलची पावडर
  • काजू
  • खोबऱ्याचे तुकडे
  • तूप
  • खसखस
  • बडीशेप पावडर
  • सुंठ पावडर
विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

कृती:

  • अखख्या गव्हाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, गहू पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तीन वेळा गहू धुतल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका आणि कॉटनच्या कपड्यावर गहू सुकवण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर कोरडे झालेले गहू खलबत्यामध्ये घालून जाडसर कुटून घ्या. यामुळे त्यांच्यावरील साल निघून येईल.
  • कुकरच्या भांड्यात खपली गहू आणि गरजेनुसार पाणी घालून गहू मऊ होईपर्यंत ५ ते ६ शिट्या काढून घ्या. यामुळे गहू व्यवस्थित मऊ होईल.
  • गहू शिजल्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात काजू आणि खोबऱ्याचे तुकडे लालसर होईपर्यंत भाजा. भाजल्यामुळे पदार्थाची चव मस्त लागते.
  • भाजलेले साहित्य खीरीमध्ये ओतून मिक्स करा. त्यानंतर त्यात सुंठ पावडर, बडीशेप पावडर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा.
  • १० मिनिटं खीरीला मंद आचेवर उकळी आल्यानंतर गॅस बंद करून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेली खपली गव्हाची खीर.

Web Title: Pitru paksha prepare whole wheat kheer in the traditional marathwada style during pitru paksha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Pitru Paksha

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना
1

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.