
पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
Rajasthani Traditional Food: दुपारच्या जेवणात किंवा इतर वेळी भाजी, आमटी बनवण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास काहींना काही झणझणीत आणि टेस्टी पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये लसूण मिरचीची चटणी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. गरमागरम भाकरी किंवा वाफाळत्या भातासोबत लसूण चटणी सुंदर लागते. खलबत्यामध्ये कुटून बनवलेल्या चटणीची चव खूप भन्नाट लागते. लसूण खाण्याचा सगळेच खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेल्या चटण्या मुलांना खाण्यास द्याव्यात. चला तर जाणून घेऊया लसूण मिरची चटणी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)