सकाळच्या न्याहारीला झटपट काय बनवावं हा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच सकाळची न्याहारी ही आरोग्यदायी देखील असावी असाही अनेकांचा आग्रह असतो. अशावेळी झटपट आणि हेल्थी रेसीपी करणं उचीत ठरेल. आम्ही तुमच्यासाठी झटपट होणारी पनीर सँडवीच रेसीपी घेऊन आलो आहोत.
साहित्य : १०० ग्राम स्लाइस पनीर तुकडे २ ब्रेड स्लाइस आमचूर पावडर १ चिमुटभर लाल तिखट १ चिमुटभर मीठ
साहित्य :
१०० ग्राम स्लाइस पनीर तुकडे
२ ब्रेड स्लाइस
आमचूर पावडर
१ चिमुटभर लाल तिखट
१ चिमुटभर मीठ
बटर
कृती :
प्रमथ एका तव्यात बटर गरम करा. मग त्यात पनीरचे तुकडे, आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ टाका.
झाकण ठेवून एक वाफ आणा.
नंतर हे मिश्रण दोन ब्रेडच्यामध्ये भरा आणि टोस्ट करा.
तयार आहे झटपट पनीर सँडविच. टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.






