Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Recipe: टम्म फुगलेली मेथीची पुरी घरी कशी तयार करावी? जाणून घ्या सोपी रेसिपी

हिवाळ्याचा ऋतू सुरु आहे, या ऋतूत मेथी बाजारात मोठ्या प्रमाणात येते. तुम्हाला मेथीची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून कुरकुरीत अशी पुरी तयार करू शकता. रेसिपीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 18, 2024 | 11:50 AM
Video Recipe: टम्म फुगलेली मेथीची पुरी घरी कशी तयार करावी? जाणून घ्या सोपी रेसिपी

Video Recipe: टम्म फुगलेली मेथीची पुरी घरी कशी तयार करावी? जाणून घ्या सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

सध्या हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत थंडीसह बाजारात अनेक भाज्या विक्रीसाठी येतात आणि त्याही कमी किमतीत. या ऋतूत लोक भरपूर भाज्यांचा आस्वाद घेऊ शकतात. हिवाळ्यात पालक, मेथी इत्यादी पालेभाज्यांपासून अनेक पदार्थ बनवले जातात. यात मेथीची पुरी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. लहान मुले बऱ्याचदा मेथीची भाजी खाणे टाळतात मात्र ही भाजी आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरत असते. अशात तुम्ही त्यांना मेथीची पुरी तयार करून खाऊ घालू शकता.

कुरकुरीत आणि चविष्ट अशी पुरी खायला कोणाला आवडत नाही. मात्र आपली रेसिपी फसली की ही पुरी हवी तशी होत नाही, टम्म फुगत नाही. आता पुरी फुगलेली नसेल तर तिला खाण्यात काही मजा नाही अशात आज आम्ही तुमच्यासोबात मेथी पुरीची एक सोपी रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते आणि यासाठी फार साहित्याचीही आवश्यकता भासत नाही. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरीच पौष्टिक आणि टम्म फुगलेली मेथीची पुरी तयार करू शकता. सोशल मीडियावर मेथी पुरीची एक भन्नाट रेसिपी शेअर करण्यात आली आहे, जी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग त्वरित नोट करा यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Recipe: आता रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ घरीच बनवा, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

साहित्य

  • मेथी
  • तेल
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • आलं
  • लसूण
  • बडीशेप
  • ओवा
  • जिरे
  • हळद
  • धनेपूड
  • लाल तिखट
  • मीठ
  • दही
  • गव्हाचे पीठ
  • बेसन
  • तूप
  • पाणी

Potato Egg Roll: बटाट्यापासून बनवा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश

कृती

  • मेथी पुरी तयार करण्यासाठी सर्वप्रथम मेथी स्वछ पाण्याने धुवून घ्या
  • यानंतर मेथी बरीं चिरून घ्या
  • नंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • आता यातचिरलेली मेथी टाकून हलकी परतून घ्या
  • हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूणची एकत्र पेस्ट तयार करा
  • यानंतर एका भांड्यात परतलेली मेथी, आलं-लसूण-मिरची पेस्ट, बडीशेप, जिरे, हळद, धनेपूड, ओवा, लाल तिखट, मीठ, थोडे दही टाका
  • सर्व साहित्य नीट एकत्र करा
  • मग यात गव्हाचे पीठ, बेसन पीठ आणि एक चमचा तूप टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्या
  • मळलेले कणिक 15 मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्या
  • यानंतर पिठाचे लहान लहान गोळे तयार करा आणि याच्या पुऱ्या लाटा
  • शेवटी गॅसवर एका कढईत तेल गरम करा
  • तेल गरम झाले की यात तयार पुऱ्या टाका
  • लक्षात ठेवा, पुऱ्या लाटताना त्या जास्त जाडही असू नयेत आणि फार पातळही असू नयेत
  • मध्यम आचेवर या पुऱ्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळा आणि एका प्लेटीत काढून घ्या
  • अशाप्रकारे तुमच्या चविष्ट आणि पौष्टिक मेथीच्या पुऱ्या तयार होतील
  • मेथी पुऱ्यांची ही रेसिपी @sonamrananaware नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Know how to make puffed cripsy methi puri watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 11:50 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’
2

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा
3

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक
4

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.