मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2022) सण जवळ आला की तिळगुळाचे लाडू बनवण्याची लगबग सुरु होते. तिळगुळाचे लाडू (Tilgul Ladu) बनवण्याची सोपी पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
साहित्य – १/२ किलो तिळ, १/२ किलो चिकीचा गूळ,१ ते दिड वाटी शेंगदाण्याचे कूट,१ वाटी किसून भाजलेले सुकं खोबरं, १/२ वाटी चण्याचं डाळं,१ चमचा वेलची पूड,१ ते २ चमचे तूप
[read_also content=”पोंगलचे महत्त्व समजून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/pongal-2022-how-pongal-is-celebrated-in-india-nrsr-221522.html”]
कृती – सगळ्यात आधी तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. गॅसवर एक भांडे ठेवावे. त्या भांड्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करा,सतत ढवळत राहा. गूळ पूर्ण पातळ झाला की थोड्या वेळाने तो फेसाळतो.
पाक गोळीबंद झाला आहे का हे पाहण्यासाठी गुळाचा पाक फेसाळला की गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा.बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा ‘टण्ण’ असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
पाक गोळीबंद झाला की त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याच्या डाळा, वेलची पूड घालून नीट ढवळा आणि गरम असतानाच लाडू वळा. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावा ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही. अशा पद्धतीने तुमचे तिळगुळाचे लाडू तयार आहेत.