फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, 27 नक्षत्रांपैकी ज्येष्ठ नक्षत्र’ हे श्रेष्ठता, ज्ञान आणि अधिकाराचे प्रतीक मानले जाते. या नक्षत्राच्या नावाचा अर्थ ‘सर्वात मोठा आणि सर्वात जुना’ असा होतो. या नक्षत्राच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांमध्ये तीक्ष्ण बुद्धिमत्ता, नेतृत्व क्षमता आणि प्रबळ इच्छाशक्ती असते. पंचांगानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ 19 नोव्हेंबरपासून या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. या नक्षत्रामध्ये तो 7 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. ग्रहप्रमुख सध्या अनुराधा या शनी नक्षत्रात विराजमान आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध याच्या मालकीच्या ज्येष्ठा नक्षत्रात मंगळाचे संक्रमण ही ज्योतिषशास्त्रामधील एक महत्त्वाची घटना मानली जाते. या संक्रमणामुळे लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्याचे धाडस मिळेल आणि ते त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून यश मिळवू शकतील. या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार असला तर काही राशीच्या लोकांना या संक्रमणाचा अधिक फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या
19 नोव्हेंबरपासून मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. ज्येष्ठ नक्षत्रात मंगळाच्या प्रवेशामुळे तुमची ऊर्जा आणि धैर्य वाढेल. तुम्हाला नवीन कामे हाती घेण्याची प्रेरणा मिळेल. जुन्या गुंतवणुकीत किंवा आर्थिक बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या ध्येयांकडे वेगाने वाटचाल कराल. कुटुंब आणि समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. या काळात केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. या काळात नवीन संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. संपत्ती आणि यश दोन्हीमध्ये वाढ होईल. मंगळाच्या संक्रमणामुळे तुमचे करिअर आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. नवीन संधी उपलब्ध होतील आणि तुम्ही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकाल. व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. खूप मेहनत घेतल्यास अपेक्षित फळ मिळेल. कुटुंबात आनंद आणि समृद्धीचे वातावरण राहील. मित्र आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण किंवा कौशल्य विकासात प्रगती देखील शक्य आहे.
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. ज्येष्ठ नक्षत्रात मंगळाची उपस्थिती तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढवेल. कोणताही नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय फायदेशीर ठरेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि विवेकबुद्धी तुम्हाला योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सक्षम करेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन समाधानकारक राहील. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मंगळ ग्रहाचे नक्षत्र संक्रमण 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे
Ans: मंगळ ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणाचा मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार आहे
Ans: मंगळाचे संक्रमण ज्येष्ठा नक्षत्रात होणार आहे






