Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Banana Cake: मायक्रोवेव्हमध्ये नाही तर पॅनमध्ये बनवा हेल्दी-टेस्टी बनाना केक, एकदा खाल तर खातच रहाल

तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आता मायक्रोवेव्हशिवाय घरीच चवदार असा केक तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला केळीपासून मऊदार आणि चविष्ट असा केक कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 20, 2025 | 12:47 PM
Banana Cake: मायक्रोवेव्हमध्ये नाही तर पॅनमध्ये बनवा हेल्दी-टेस्टी बनाना केक, एकदा खाल तर खातच रहाल

Banana Cake: मायक्रोवेव्हमध्ये नाही तर पॅनमध्ये बनवा हेल्दी-टेस्टी बनाना केक, एकदा खाल तर खातच रहाल

Follow Us
Follow Us:

केक हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. हा एक पाश्चात्य पदार्थ असला तरी जगभरात याला आवडीने खाल्ले जाते. आपल्याकडे अधिकतर कोणाचा वाढदिवस किंवा कोणती गोष्ट साजरी करायची असेल तेव्हा आवर्जून केक आणला जातो आणि आनंद साजरा केला जातो. हा केक अधिकतर बाजारातून विकत घेतला जातो मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हा केक घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता.

आज आम्ही तुम्हाला या लेखात केळीचा केक कसा बनवायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला मायक्रोवेव्हचीही गरज नाही. तुम्ही हा केक पॅनमध्येच तयार करू शकता. कोणत्या खास प्रसंगी घरातील सर्वांना खुश करायचे असल्यास ही रेसिपी तुमच्या कामी येईल. केळीपासून तयार केलेला हा मऊदार केक सर्वांनाच फार आवडेल. अजूनही कधी घरी केक बनवून पाहिला नसेल तर एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून पहाच. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

नारळाची चटणी खाऊन कंटाळा आलाय? मग यावेळी इडली-डोसासोबत बनवा शेंगदाण्याची चटणी

साहित्य

  • दोन पिकलेली केळी
  • एक वाटी गव्हाचे पीठ
  • अर्धी वाटी मध किंवा गूळ पावडर
  • एक चतुर्थांश कप दूध
  • दोन चमचे तेल किंवा बटर
  • एक चमचा बेकिंग पावडर
  • अर्धा चमचा बेकिंग सोडा
  • एक चमचा व्हॅनिला इसेन्स
  • दालचिनी पावडर
  • एक चिमूटभर मीठ
  • व्हॅनिला इसेन्स
  • ड्रायफ्रूट्स ( बदाम, काजू, अक्रोड)
घरीच बनवा वर्षानुवर्षे टिकणारं भरलेलं तिखट मिरचीचं लोणचं, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

कृती

  • केळीचा केक बनवण्यासाठी प्रथम केळी सोलून चांगले मॅश करा
  • आता एका भांड्यात मॅश केलेली केळी, दूध, लोणी, मध आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा
  • यानंतर या मिश्रणात मीठ आणि दालचिनी पावडर घाला आणि मिक्स करा
  • आता एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून चाळून घ्या
  • हे मिश्रण केळीच्या मिश्रणात घालून मिक्स करा. जर पीठ खूप घट्ट झाले तर तुम्ही त्यात थोडे दूध घालू शकता
  • यानंतर या पिठात चिरलेले बदाम, अक्रोड आणि काजू मिसळा
  • आता गॅसवर नॉन-स्टिक पॅन ठेवा आणि मंद आचेवर गरम करा
  • पॅनला तेलाने ग्रीस करा आणि केकचे पिठ हळूहळू पॅनमध्ये घाला आणि झाकणाने झाकून ठेवा. आता तुम्हाला हा
  • केक साधारण अर्धा तास मंद आचेवर शिजू द्यावा लागेल
  • 25-30 मिनिटांनंतर, केकमध्ये टूथपिक घाला आणि केक व्यवस्थित शिजला आहे की नाही ते तपासा. केक
  • शिजला असेल तर कढईतून बाहेर काढा आणि थंड होऊ द्या
  • तुमचा केळीचा केक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. या केकचे तुकडे करून तुम्ही सर्व्ह करू शकता

Web Title: Make this healthy tasty banana cake in a pan instead of in the microwave recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ
1

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
2

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
3

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
4

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.