Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

तुम्हीही स्ट्रीट फूड प्रेमी असाल तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आज आम्ही तुम्हाला मुंबईतील फेमस स्ट्रीट फूड 'मसाला पाव' घरी कसा तयार करायचा याची एक चविष्ट रेसिपी सांगत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2025 | 10:13 AM
Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Follow Us
Follow Us:

जर तुम्हाला स्ट्रीट फूड लव्हर्स असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक तिखट, मसालेदार आणि झटपट अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. आम्हाला खात्री आहे की, ही रेसिपी तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल. मुख्य म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी अधिक साहित्य किंवा वेळेची गरज भासत नाही तुम्ही अगदी काही मिनिटांतच हा पदार्थ बनवू शकता आणि याचा आनंद लुटू शकता. तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे मसाला पाव.

मसाला पाव हे एक मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड आहे. याची चव मसालेदार आणि चटपटीत अशी असते. क्रिमी लज्जतदार भाजीमध्ये लपेटलेला सॉफ्ट पाव आणि वरून आंबट लिंबाचा रस… विचार करा याची चव किती अप्रतिम लागत असेल. अहो, विचारच काय करताय हा पदार्थ घरीही बनवून खा. सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी एक परफेक्ट पर्याय ठरेल. याची चव चाखताच कुटुंबीय तुमच्यावर खुश होतील आणि बोटंच चाटत राहतील. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Mahashivratri 2025: रबरासारखी चिकट बनतेय साबुदाणा खिचडी? मग या टिप्स फॉलो करा; खिचडी बनेल मोकळी अन् चविष्ट

(फोटो सौजन्य: BetterButter)

साहित्य

  • 4 पाव
  • 2 चमचे लोणी
  • 1 टीस्पून तेल
  • 1 लहान शिमला मिरची
  • बारीक चिरलेला 1 टोमॅटो
  • बारीक चिरलेला 1 कांदा
  • 1-2 हिरव्या मिरच्याबारीक चिरून
  • अर्धा कप शिजवलेला भजी मसाला
  • ½ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • ½ टीस्पून हळद पावडर
  • 1 टीस्पून लाल मिरची पावडर
  • 1 टीस्पून पाव भाजी मसाला
  • ¼ टीस्पून गरम मसाला
  • चिरलेली कोथिंबीर
  • 1 लिंबू
साधं पण चवदार असं काही खायचंय? मग सोप्या पद्धतीने घरी बनवा सिंधी स्टाइल दाल पकवान

कृती

  • यासाठी सर्वप्रथम, एक पॅन गरम करा आणि त्यात 1 टेबलस्पून बटर आणि थोडे तेल घाला. आता त्यात चिरलेला
  • कांदा, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या
  • आता सिमला मिरची आणि टोमॅटो घाला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत 2-3 मिनिटे चांगले शिजवा
  • आता त्यात हळद, तिखट, पावभाजी मसाला आणि गरम मसाला घालून मिक्स करा. जर तुमच्याकडे उरलेली
  • पावभाजी असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता, त्यामुळे मसाला आणखी चवदार होईल
  • मसाला चांगला शिजल्यावर थोडेसे ओले करण्यासाठी थोडे पाणी घाला, जेणेकरून मसाला पावावर चांगला लेप करता येईल. आता कोथिंबीर घालून मिक्स करा
  • आता पाव मधून हलका कापून घ्या आणि त्याच तव्यावर १ टेबलस्पून बटर घालून हलके भाजून घ्या
  • नंतर तयार मसाला प्रत्येक पावाच्या आत आणि वर भरा आणि पॅनवर हलके दाबून शिजवून घ्या, जेणेकरून याची चव चांगली एकजीव होईल
  • शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला, आणि बस्स, तुमचा गरम गरम मसाला पाव तयार आहे
    आपल्या प्रियजजनांसह याचा आस्वाद घ्या आणि आनंद लुटा

Web Title: Masala pav a is made in just 15 minutes know the ingredients recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
2

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
3

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
4

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.