Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नारळाची चटणी खाऊन कंटाळा आलाय? मग यावेळी इडली-डोसासोबत बनवा शेंगदाण्याची चटणी

peanut Chutney Recipe: तीच तीच नारळाची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा तरी शेंगदाण्याची क्रिमी चटणी घरी बनवून पहा. याची टेस्टी चव तुम्हाला नारळाची चटणी विसरायला भाग पाडेल. शिवाय आरोग्यासाठीही ती फायदेशीर ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2025 | 09:41 AM
नारळाची चटणी खाऊन कंटाळा आलाय? मग यावेळी इडली-डोसासोबत बनवा शेंगदाण्याची चटणी

नारळाची चटणी खाऊन कंटाळा आलाय? मग यावेळी इडली-डोसासोबत बनवा शेंगदाण्याची चटणी

Follow Us
Follow Us:

विकेंड म्हटला की अनेकांच्या घरी सकाळी इडली-डोसा अशा साऊथ इंडियन नाश्त्याचा बेत असतो. हे पदार्थ फार झटपट तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. आता तुम्ही इडली बनवा अथवा डोसा अथवा मेदुवडा यासह नारळाची चटणी ही लागतेच. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हे पदार्थ नारळाच्या चटणीव्यतिरिक्त शेंगदाण्याची चटणीसह देखील खाऊ शकतात. होय तुम्ही खरे ऐकले, ही शेंगदाण्याची क्रिमी चटणी इडली-डोसाची चव द्विगुणित करते आणि हिला बनवायला फार वेळही लागत नाही.

अनेकदा असे होते आपल्या नारळाच्या चटणीसाठी आपल्याला आधीच घरी नारळ आणून ठेवावा लागतो अशात कधी हा नारळ आणायचे राहून गेल्यास आपली सकाळी फार दमछाक होते मात्र अशावेळी आता चिंता करण्याची गरज नाही कारण नारळाची ही कमी शेंगदाणे भरून काढून शकतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण शेंगदाण्याची ही चटणी नारळाच्या चटणीपेक्षा चवीला छान लागते. शिवाय शेंगदाणे आरोग्यालाही फायदेशीर ठरतात. अनेक यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, आणि खनिजे आढळले जातात. चला जाणून घेऊया शेंगदाण्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

घरीच बनवा वर्षानुवर्षे टिकणारं भरलेलं तिखट मिरचीचं लोणचं, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

साहित्य

  • 1 कप शेंगदाणे
  • 1/2 कप किसलेले खोबरे
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 1/2 इंच आले किसलेले
  • 1/4 कप पाणी
  • चवीनुसार मीठ
  • 1 टीस्पून लिंबाचा रस
  • 1 टीस्पून तेल
  • 1/2 टीस्पून मोहरी
  • 1/4 टीस्पून जिरे
  • 1/4 टीस्पून हिंग
  • 8-10 कढीपत्ता
Sprouts Dosa: सकाळच्या नाश्त्याला बनवा पौष्टिक पण चविष्ट असा हिरव्या मूग डाळीचा डोसा

कृती

  • शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये शेंगदाणे मंद आचेवर 9-10 मिनिटे छान भाजून घ्या
  • त्यांनतर त्यांना थंड होऊ द्या आणि मग शेंगदाण्याची सालं वेगळी करा
  • ब्लेंडरमध्ये शेंगदाणे, खोबरे, हिरव्या मिरच्या, आले आणि पाणी घाला
  • सर्व साहित्य गुळगुळीत होईपर्यंत बारीक करा
  • एका भांड्यात चटणी काढा आणि त्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि तेल टाकून गरम करा
  • मग त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घाला
  • मोहरी तडतडायला लागली की तयार शेंगदाण्याची पेस्ट यात घाला
  • आवश्यक असल्यास यात थोडे पाणी घाला आणि चटणी 2-3 मिनिटे शिजू द्या
  • तयार गरमा गरम चटणी खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Tired of eating coconut chutney then this time make peanut chutney with idli dosa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • breakfast tips
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
1

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी
2

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
4

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.