Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीचं जेवण ठरतंय आजारांचे कारण? वेळीच बदला ‘या’ सवयी, नाहीतर होईल पश्चाताप

Foods To Avoid At Night Time: रात्री शरीराची हालचाल कमी होत असल्याने पचनक्रियाही मंदावते, त्यामुळे जड, तेलकट आणि जास्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्यास अपचन, गॅस, अॅसिडिटी आणि झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 24, 2026 | 08:04 PM
रात्रीचं जेवण ठरतंय आजारांचे कारण? वेळीच बदला ‘या’ सवयी, नाहीतर होईल पश्चाताप
Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या जेवणात करू नका ही चूक
  • आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
  • आरोग्यासाठी काय खावे?
दिवसभर काय खाल्ले याइतकेच महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्या जेवणात काय खाल्ले जाते. रात्री शरीराची हालचाल कमी होत असल्याने पचनक्रियाही तुलनेने मंदावते. अशा वेळी जड, तेलकट किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यास अपचन, गॅस, अॅसिडिटी आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री हलका, संतुलित आणि सहज पचणारा आहार घेणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते.

साधा सर्दी-खोकला समजून दुर्लक्ष करताय? डोके आणि मानेच्या कर्करोगाची सुरुवातीची ‘ही’ 5 लक्षणे ओळखा

तळलेले आणि तेलकट पदार्थ टाळा

भजी, समोसे, फ्रेंच फ्राईज किंवा इतर डीप फ्राय पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ पचायला वेळ लागतो. त्यामुळे पोट जड होणे, अॅसिडिटी आणि झोपेत व्यत्यय येण्याची शक्यता वाढते.

अतितिखट आणि मसालेदार पदार्थ कमी खा

रात्री जास्त तिखट किंवा मसालेदार जेवण केल्यास छातीत जळजळ, अपचन आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः अॅसिडिटीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अशा पदार्थांपासून दूर राहावे.

मिठाई आणि साखरयुक्त पदार्थ टाळा

रात्री गोड पदार्थ, केक, पेस्ट्री किंवा आईस्क्रीम खाल्ल्यास रक्तातील साखरेत चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे झोपेवर परिणाम होण्यासोबतच वजन वाढण्याचाही धोका असतो.

कॅफिनयुक्त पेये पिणे टाळा

रात्री उशिरा चहा, कॉफी किंवा जास्त कॅफिन असलेली पेये घेतल्यास झोप उशिरा लागणे किंवा वारंवार जाग येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रात्री ही पेये शक्यतो टाळावीत.

जंक फूडपासून अंतर ठेवा

पिझ्झा, बर्गर, नूडल्स आणि इतर प्रक्रिया केलेले पदार्थ मीठ, चरबी आणि कॅलरींनी भरलेले असतात. अशा पदार्थांचे नियमित सेवन पचनावर ताण आणते आणि वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

जास्त प्रमाणात जेवू नका

रात्री पोटभर किंवा गरजेपेक्षा अधिक जेवल्यास अन्न पचण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे अपचन, गॅस आणि झोप न येण्याची समस्या वाढते. कमी प्रमाणात पण संतुलित आहार घेणे अधिक योग्य ठरते.

आरोग्यासाठी काय खावे?

रात्रीच्या जेवणात डाळ, भाज्या, पोळी, हलका भात, सूप किंवा प्रथिनेयुक्त हलके पदार्थ यांचा समावेश करावा. तसेच झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी जेवण पूर्ण केल्यास पचन सुधारण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत होते. संतुलित आहाराच्या सवयी दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

साधा सर्दी-खोकला समजून दुर्लक्ष करताय? डोके आणि मानेच्या कर्करोगाची सुरुवातीची ‘ही’ 5 लक्षणे ओळखा

Web Title: Foods to avoid at night for better sleep and digestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • food
  • health care news
  • side effect
  • sleep problems

संबंधित बातम्या

साधा सर्दी-खोकला समजून दुर्लक्ष करताय? डोके आणि मानेच्या कर्करोगाची सुरुवातीची ‘ही’ 5 लक्षणे ओळखा
1

साधा सर्दी-खोकला समजून दुर्लक्ष करताय? डोके आणि मानेच्या कर्करोगाची सुरुवातीची ‘ही’ 5 लक्षणे ओळखा

Stress Eating: मूड खराब होताच भूक लागते? ‘स्ट्रेस ईटिंग’ची ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका
2

Stress Eating: मूड खराब होताच भूक लागते? ‘स्ट्रेस ईटिंग’ची ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

Health Tips: रात्री उशिरापर्यंत जागे राहता? ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो, मिळेल गाढ आणि शांत झोप
3

Health Tips: रात्री उशिरापर्यंत जागे राहता? ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो, मिळेल गाढ आणि शांत झोप

Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या योग्य प्रमाण
4

Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या योग्य प्रमाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.