सुंदर त्वचेसाठी नेहमीच विकत साबण आणण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा अळशीचा साबण
शरीर स्वच्छ करण्यासाठी महिला साबण, बॉडी वॉश आणि इतर वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र बऱ्याचदा तरीसुद्धा त्वचा स्वच्छ होत नाही. सुंदर त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र यामुळे त्वचा आणखीनच निस्तेज आणि खराब होऊन जाते. महिलांसह पुरुषसुद्धा चेहऱ्याची काळजी घेतात, मात्र शरीरावरील त्वचेची जास्त काळजी घेतली जात नाही. त्वचा निस्तेज किंवा कोरडी झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र बाजारात उपलब्ध असलेले साबण किंवा इतर बॉडी वॉशमध्ये हानिकारक रसायनांचा वापर केला जातो. या रसायनांच्या वापरामुळे त्वचेची नुकसान होते.(फोटो सौजन्य – pinterest)
काखेत वाढलेला काळेपणा लवकर जात नाही?आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, काळेपणा होईल गायब
बाजारात उपलब्ध असलेल्या हानिकारक स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. त्वचा आणि केसांसाठीअळशीच्या बिया अतिशय प्रभावी आहेत. अळशीच्या बियांमध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. अळशीच्या बियांपासून तयार केलेले जेल त्वचा आणि केसांसाठी तुम्ही वापरू शकता. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन ई इत्यादी अनेक घटक आढळून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अळशीच्या बियांचा वापर करून साबण बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या साबणाचा नियमित वापर केल्यास त्वचेवरील टॅन कमी होईल.
सैलसर ब्रा मुळे त्रस्त…हंसाजींनी दिल्या नैसर्गिक टिप्स; Breast Size होईल परफेक्ट
अळशीच्या बियांचा साबण बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बॉऊलमध्ये पाणी घेऊन त्यात अळशीच्या बिया भिजत ठेवा. त्यानंतर तयार केलेले पाणी टोपात घेऊन गॅसवर शिजवून घ्या. १५ मिनिटं पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्यावे. तयार केलेले पाणी थंड झाल्यानंतर जेल सारखे दिसू लागेल. त्यानंतर मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात मध आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात ट्रान्सपरंट सोप बेस घालून व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण व्यवस्थित मिक्स होईपर्यंत चमच्याने सतत मिक्स करत राहा. त्यानंतर बर्फाच्या ट्रेमध्ये किंवा वाटीमध्ये तयार केलेले मिश्रण ओतून सेट होण्यासाठी ठेवा. ४ तासांनंतर तयार होईल अळशीच्या बियांचा वापर करून बनवलेला साबण. हा साबण नियमित अंघोळीसाठी वापरल्यास काही दिवसांमध्येच फरक दिसून येईल.