स्तनांचा आकार वाढविण्यासाठी सोप्या टिप्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
लहान स्तन असणे यात लज्जास्पद काहीही नाही आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, तरीही काही महिलांना लहान स्तनांच्या आकारामुळे आत्मविश्वासाच्या कमतरतेची समस्या भेडसावते. साधारणपणे, लहान स्तनांचा आकार ही समस्या नाही, परंतु तरीही महिला स्तन मोठे करण्यासाठी औषधे घेतात आणि कधीकधी शस्त्रक्रिया करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत.
अनेक सेलिब्रिटींनीही यासाठी शस्त्रक्रियेचा आधार घेतल्याचे तुम्हाला दिसून आले असेल. अगदी हॉलीवूड, बॉलीवूड सेलिब्रेटींची एक यादीही तयार होईल. जर तुम्हाला तुमचे स्तन वाढवायचे असतील किंवा शस्त्रक्रिया आणि औषधांशिवाय नैसर्गिकरित्या स्तनांना मोठे आणि गोलाकार बनवायचे असेल, तर हा लेख तुम्ही नक्की वाचा (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
हंसाजी योगेंद्र यांच्या सोप्या टिप्स
या लेखात आपण प्रसिद्ध योगतज्ज्ञ हंसाजी योगेंद्र यांच्या व्हिडिओबद्दल काही गुजगोष्टी करूया. या व्हिडिओमध्ये हंसाजींनी महिलांना घरी बसून पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने स्तनांचा आकार वाढवण्याच्या टिप्स सांगितल्या आहेत. जर तुम्ही या टिप्स तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवल्या तर तुम्हाला लक्षात येईल की कालांतराने तुमच्या स्तनांचा आकार हळूहळू वाढू लागला आहे. या उपयुक्त टिप्स नक्की कोणत्या आहेत याची आपण माहिती घेऊया
ब्रा वापरणे सोडले तर शरिरात कोणते बदल होतात जाणून घ्या…
दुधासह डेअरी उत्पादनाचा वापर
दूध आणि दुधाने तयार केलेले पदार्थ
दुधाची चव अनेकाना आवडत नाही परंतु त्याचे सेवन स्तनांच्या आकारात वाढ होण्यासोबतच इतर अनेक आरोग्य समस्या टाळू शकते. दुधात प्रजनन संप्रेरकांची पातळी असते, जी स्तनांचा आकार आणि प्रजनन क्षमता वाढविण्यास मदत करते हे अभ्यासातूनही सांगण्यात आले आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने स्तनात रक्तप्रवाहदेखील वाढतो. यासाठी, तुम्ही दिवसभरात कधीही दूध पिऊ शकता किंवा तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता असा सल्ला हंसाजी यांनी दिला आहे.
व्हिगन महिलांसाठी
व्हिगन महिलांनी काय खावे
व्हिगन महिला या वनस्पती-आधारित पदार्थ खातात. या महिला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करत नाहीत. जर तुम्हीही व्हिगन असाल तर नियमित दुधाऐवजी तुम्ही बदामाचे दूध, सोया दूध आणि नारळाचे दूध घेऊ शकता. यामुळे स्तनांचा आकार नैसर्गिकरित्या वाढू शकतो.
मेथी दाण्याचा नैसर्गिक उपयोग
स्तन वाढविण्यासाठी मेथी दाणे
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा स्तनपान देत असाल तर मेथीचे दाणे खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी, रात्रभर एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी हे मेथीचे दाणे पाण्यासोबत चावून खा. यामुळे स्तनांचा आकार वाढण्यास मदत होऊ शकते आणि शिवाय नवजात मातांना दूधही चांगले येते.
सुडौल बांध्यासाठी वापरताय घट्ट ब्रा? होऊ शकतात आरोग्यावर गंभीर परिणाम
नट्स आणि बियांचे सेवन
नट्स आणि बिया खाण्याचे फायदे
स्तनांचा आकार वाढवण्यासाठी काजू, नट्स आणि बियांचे सेवन करणे फायदेशीर आहे. तुम्ही दररोज नाश्त्यात काजू, बदाम आणि रोस्टेड बिया खाऊ शकता किंवा तुम्ही बिया रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्यावर खा. या दोन्ही पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी स्तनांचा आकार वाढवण्यासोबत मेंदू आणि हृदय निरोगी ठेवतात. अशा परिस्थितीत तुम्ही बदाम, अक्रोड, अळशी आणि सूर्यफूल बियाणे खाऊ शकता.
हंसाजी योगेंद्र यांचा मोलाचा सल्ला
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.