Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागडे फेशिअल करणे कायमचे जा विसरून! दूधासारख्या नितळ चमकदार त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, त्वचेवर येईल नॅचरल गुलाबी ग्लो

चेहेर्यावरील नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी केशरचा आहारात समावेश करा. यामुळे त्वचा डागविरहित आणि गुलाबी गाल दिसतील. केशरच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. जाणून घ्या केशर वापरण्याची योग्य पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2026 | 09:09 AM
महागडे फेशिअल करणे कायमचे जा विसरून! दूधासारख्या नितळ चमकदार त्वचेसाठी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचेवर येईल नॅचरल गुलाबी ग्लो

महागडे फेशिअल करणे कायमचे जा विसरून! दूधासारख्या नितळ चमकदार त्वचेसाठी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचेवर येईल नॅचरल गुलाबी ग्लो

Follow Us
Follow Us:

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी महिला कायमच बाजारातील महागड्या ट्रीटमेंट आणि सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रीम, फेस सिरम इत्यादी अनेक गोष्टींचा वापर करतात. चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम आल्यानंतर त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते आणि त्वचेच्या समस्या वाढू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे चिकटपणा वाढून त्वचेवर धूळ, मातीचे कण जमा होऊन तसेच साचून राहतात. हे कण त्वचेच्या छिद्रांमध्ये गेल्यानंतर तिथे पिंपल्स किंवा मुरुमांचे बारीक बारीक फोड येण्यास सुरुवात येते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी स्किन केअरमध्ये सतत बदल करण्याऐवजी त्वचेला पोषण मिळेल अशा पदार्थांचे आहारात सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवर आतून नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा सुंदर आणि हायड्रेटेड दिसते.(फोटो सौजन्य – pinterest)

टॅनिंग आणि डार्क सर्कल होतील ७ दिवसांमध्ये कमी! गूळ लिंबाचा फेसपॅक चेहऱ्यावर आणेल मोत्यासारख्या ग्लो, त्वचा दिसेल फ्रेश

हल्ली प्रत्येकाला कोरियन आणि काश्मिरी मुलींप्रमाणे सुंदर, नितळ आणि गुलाबी गाल, डागविरहित त्वचा हवी असते. हा ग्लो मिळवण्यासाठी काश्मिरी महिला कोणत्याही महागड्या स्किन केअरचा किंवा सिरमचा वापर न करता नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय करण्यावर जास्तीचा भर देतात. त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि तजेलदार ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा आहारात आणि स्किन केअरमध्ये समावेश केल्यास त्वचा खूप जास्त सुंदर आणि ग्लोइंग दिसेल. चला तर जाणून घेऊया काश्मिरी महिलांच्या ग्लोइंग त्वचेचे रहस्य.

त्वचेसाठी केशराचा वापर:

चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी केशरचा वापर केला जातो. तसेच त्वचेसाठी केशर खूप जास्त हेल्दी मानले जाते. पूर्वी काश्मिरी महिला केशर, दूध किंवा गुलाब पाण्यात भिजवून चेहऱ्यावर फेसपॅक म्हणून लावत होत्या. यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक वाढते आणि त्वचा डागविरहित गोरीपान सुंदर दिसते. याशिवाय केशर दुधात किंवा पाण्यात भिजवून त्वचेवर लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज केल्यास महिनाभरात फरक दिसून येईल. बाजारात उपलब्ध असलेल्या फेसमास्क, सीरम, फेस ऑईल आणि आयुर्वेदिक स्किनकेअरमध्ये केशरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

कहवा ब्यूटी ड्रिंक:

काश्मीरमध्ये कहवा नावाचा सुगंधी चहा बनवून प्यायला जातो. हा चहा केशर, ग्रीन टी, बदाम, दालचिनी आणि वेलची इत्यादी पदार्थांपासून बनवला जातो. यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात उष्णता मिळते आणि कडाक्याच्या थंडीत सुद्धा शरीर निरोगी आणि फिट राहते. केशरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स स्किनला हेल्दी आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कहवा हे ब्युटी ड्रिंक नक्कीच बनवून पहा.

Haircare Tips : घामामुळे केस चिकट होतात? जाणून घ्या स्कॅल्प हेल्दी ठेवण्याचे सोपे उपाय

बदाम तेलाचा वापर:

बदाम शरीरसोबतच त्वचेला सुद्धा पोषण देतात. वर्षानुवर्षे काश्मिरी ब्यूटी स्किन केअरचा महत्वाचा भाग म्हणजे बदाम. बदामात असलेले गुणकारी घटक त्वचा कायमच फ्रेश आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. बदाम तेलाचा वापर त्वचेवर मसाज करण्यासाठी करावा. फेस मसाज केल्यामुळे डोळ्यांखालील ड्रायनेस, काळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Forget expensive facials forever do this home remedy for milky smooth glowing skin the skin will have a natural pink glow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ
1

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी
2

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी, नोट करून घ्या रेसिपी
3

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी, नोट करून घ्या रेसिपी

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ
4

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.