
पोटात सडलेला कचऱ्यामुळे वारंवार अपचन होत? मग आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया, मानसिक तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. जगभरात आतड्यांच्या कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा तर शरीरात निर्माण झालेल्या रक्ताच्या कमतरतेमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. कोणत्याही वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. आतड्यांचा कॅन्सर होण्याआधी शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र हळूहळू शरीरात दिसून येणारी हीच लक्षणे गंभीर स्वरूप घेऊन आरोग्यासाठी जीवघेणे ठरतात. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
सतत तिखट, तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात गॅस होणे, पोटात वेदना होणे, आंबट ढेकर, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या दिसून येतात. त्यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पोटात सडलेला कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे केवळ पचनक्रिया नाहीच तर संपूर्ण आरोग्य निरोगी राहील.
दैनंदिन आहारात नियमित आंबट फळांचे सेवन करावे. संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्ष इत्यादी फळांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. ही फळे शरीराला कायमच फ्रेश ठेवतात. आंबट फळांमध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पौष्टिक घटक शरीरातील दाह कमी करून पचनक्रिया सुधारतात. यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया वाढवतात, ज्यामुळे आतड्यांचे रक्षण होते. सकाळी उठल्यानंतर नियमित लिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाईल.
आंबटगोड चवीचे किवी हे फळ आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा खावे. हे फळ किमतीने महाग असले तरीसुद्धा या फळांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पोटात वाढलेला जडपणा, पोट फुगणे किंवा ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी किवीचे सेवन करावे. नियमित किवीचे सेवन केल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि कधीच बद्धकोष्ठता होणार नाही.
दीर्घकाळ निरोगी आणि तरुण राहण्यासाठी डॉक्टरसुद्धा सफरचंद खाण्याचा सल्ला दिला देतात. सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. यामध्ये पेक्टिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे आतड्याच्या पेशींवर संरक्षणात्मक थर तयार होतो. सफरचंदमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक परिणामांपासून शरीराचे रक्षण करतात.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता म्हणजे आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा मलविसर्जन होणे किंवा शौचास त्रास होणे.
बद्धकोष्ठतेची कारणे कोणती आहेत?
आहारात फायबरची कमी, डिहायड्रेशन आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन.व्यायामाचा अभाव.तणाव, पचनसंस्थेतील समस्या.
बद्धकोष्ठतेवर उपाय काय आहेत?
पुरेसे पाणी प्या आणि आहारात फायबरयुक्त पदार्थांचा (फळे, भाज्या, संपूर्ण धान्य) समावेश करा.शौचालयाला जाण्याची सवय नियमित करा.डॉक्टर सल्फर सप्लिमेंट्ससारखी औषधे सुचवू शकतात.