लघवी करताना वारंवार फेस येत असेल तर वेळीच व्हा सावध! किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे
शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्यासंबंधित दिसून येणाऱ्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. महिलांमध्ये लघवीसंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. लघवीमध्ये वारंवार येणारा फेस, जळजळ, वेदना इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात, ज्यामुळे किडनीमध्ये इन्फेक्शन वाढते. त्यातील अतिशय गंभीर लक्षण म्हणजे लघवी करताना फेस येणे. ही समस्या केवळ डिहायड्रेशनमुळे नाही तर किडनीच्या आजारांमुळे सुद्धा उद्भवते.(फोटो सौजन्य – istock)
मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकते. यासोबतच रक्त देखील शुद्ध करते. पण किडनी खराब झाल्यानंतर रक्तातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी रक्तात तशीच साचुन राहते, ज्यामुळे लघवी करताना वेदना होणे, ओटीपोटात दुखणे, लघवीमध्ये जळजळ इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लघवीमध्ये वारंवार फेस कोणत्या आजारांमुळे येतो? किडनी खराब झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर लघवीतून प्रोटीन बाहेर पडू लागतात, ज्यामुळे लघवी करताना खूप जास्त फेस येतो. याशिवाय शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे लघवी अधिक घट्ट होते आणि जास्त काळ लघवीला फेस आल्यासारखे दिसून येते. जास्त वेळ लघवी अडकवून ठेवल्यास किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होतात. यूटीआय आणि इतर संसर्गाची शरीराला लागण झाल्यानंतर लघवीमध्ये खूप जास्त फेस येतो. वारंवार लघवीमध्ये येणारा फेस कमी करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक आणि घरगुती उपाय करून सुद्धा आराम मिळवू शकता.
ऑईल पुलिंग म्हणजे तेलाच्या पाण्याने गुळण्या करणे. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यात तेल मिक्स करून गुळण्या कराव्यात. गुळण्या करताना तोंडातील पाणी बाहेर फेकून द्यावे. यामुळे तोंडातील दुर्गंधीपासून आराम मिळतो आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास फरक दिसून येईल.
किडनीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारते. सकाळी उठून उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. तसेच एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ किंवा लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीरातील पीएच पातळी संतुलित राहते आणि आरोग्य सुधारते.
आठवड्यातून दोनदा नारळ पाण्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. नारळ पाण्याच्या सेवनामुळे किडनी स्वच्छ होते आणि किडनीमधील घाण बाहेर पडून जाते. नारळ पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स किडनीला पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय तुम्ही जिऱ्याचे पाणी, धण्याचे पाणी सुद्धा पिऊ शकता.
किडनीच्या नुकसानीची कारणे:
रक्तातील साखरेची उच्च पातळी दीर्घकाळ राहिल्याने किडनीला नुकसान होऊ शकते. उच्च रक्तदाब किडनीवर अतिरिक्त ताण टाकतो. जेव्हा मुतखडा मूत्रमार्गात अडथळा निर्माण करतो, तेव्हा तीव्र वेदना होऊ शकतात.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी उपाय:
नियमित व्यायाम करा, जसे की चालणे, धावणे किंवा सायकलिंग.रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा.पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या.धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन टाळा.






