मैत्री हे एक सुंदर आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. मैत्रीचे नाते इतर नात्याहून फार वेगळे असते, जिथे आई-वडील, भाऊ-बहीण ही नाती आपल्याला जन्मतःच मिळतात तिथे मैत्री हे असे एकमेव नाते आहे जे तुम्ही स्व-इच्छेने बनवता. असे म्हणतात की बाकी कोणी नाय मिळाले तरी चालेल पण एक जिवाभावाचा मित्र आयुष्यात नाक्कीच असायला हवा. तुमच्या आयुष्यातही एक जिवाभावाचा मित्र तुम्हाला लाभला असेल तर यावर्षीच्या मैत्री दिनानिमित्त त्याच्यासाठी काही तरी खास करा आणि आपल्या हाताने तयार केलेले गिफ्ट त्याला जरूर भेट द्या.
जगभरात मैत्री दिवस 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. यंदाही हा खास दिवस याच दिवशी म्हणजेच रविवारी साजरा केला जाणार आहे. मैत्री दिवस हा संपूर्णपणे मैत्रीच्या नात्याला समर्पित केला जातो. या दिवसाचे खास महत्त्व म्हणजे, या दिवशी मित्र-मैत्रिणी आपल्या मित्रांना भेटवस्तू किंवा शुभेच्छा देत आपल्या आयुष्यात येण्यासाठी आणि नेहमीच मदत करण्यासाठी त्यांचे आभार मानतात.
तुम्हालाही यंदाचा फ्रेडशिप खास करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला खास भेटवस्तू गिफ्ट करू शकता. मात्र ही भेटवस्तू बिकट न घेता तुम्ही घरीच तयार करू शकता. तुमच्या मित्रासाठी तुम्ही स्वतः बनवलेले गिफ्ट पाहून नक्कीच त्याला फार छान वाटेल. आज आम्ही तुमच्यासोबत हँडमेड गिफ्ट्सच्या काही हटके आयडीयाज शेअर करत आहोत.
हेदेखील वाचा – Friendship Day 2024: आपल्या जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींना मैत्री दिनानिमित्त अनोख्या आणि उपयुक्त भेटवस्तू गिफ्ट करा
फ़्रेंडशिप डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्राला एक खास सुंदर गिफ्ट कार्ड तयार करून देऊ शकतात. यासाठी तुम्ही कार्ड बोर्ड पेपर, स्केच पेन, स्टिकर्स, मोती असा अनेक गोष्टींचा वापर करू शकता. तसेच तुम्ही यात कविता, शायरी किंवा एक स्पेशल मेसेज लिहू शकता. आम्हाला खात्री आहे की, तुमच्या मित्राला हे गिफ्ट नक्कीच आवडेल आणि याने त्याला स्पेशन फील होईल.
फ़्रेंडशिप डेला तुम्ही तुमच्या मित्राला सुंदर आणि कस्टमाइझ कॉफीचा मग गिफ्ट करू शकता. यासाठी तुम्हाला मार्केटमधून एक कॉफी मग खरेदी करावा लागेल. मग यावर तुम्ही तुमची आवडती डिजाइन आणि कलर्स वापरून याला आणखीन सुंदर बनवू शकता. तुम्ही यावर तुमच्या मित्राचे नावदेखील रेखाटू शकता.
फुलांचा बुके तर तुम्ही अनेकदा पाहिला असेल मात्र या फ़्रेंडशिप डेला आपल्या मित्राला चॉकलेटने भरपूर एक टेस्टी बुके गिफ्ट करा. हा बुके पाहून निश्चितच तुमचा मित्र आनंदी होईल. यासाठी काही चॉकलेट खरेदी करा आणि घरीच कार्ड बोर्ड पेपर आणि रिबिन्सच्या मदतीने याचा एक सुंदर बुके तयार करा.