भेसळयुक्त दूध कसे ओळखावे (फोटो सौजन्य - iStock)
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भेसळयुक्त दूध प्यायल्याने दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आता कठोर झाले आहे. शनिवारी, FSSAI टीमने आग्रा-बाह रस्त्यावर एक टँकर पकडला, ज्यामध्ये 5000 लिटर भेसळयुक्त दूध भरलेले होते. हे दूध रस्त्यावर ओतून लगेच नष्ट करण्यात आले. या दुधाची किंमत सुमारे 1.25 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र श्रीवास्तव म्हणाले की, हे दूध थर्मोस्टॅटशिवाय टँकरमध्ये आणले जात होते. तपासणीदरम्यान ते बनावट आणि भेसळयुक्त असल्याचे आढळून आले. हा टँकर मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील कैलारस येथील त्यागी डेअरीमधून पाठवण्यात आला होता. FSSAI ने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, ‘आग्रामध्ये भेसळयुक्त दुधाचा मोठा साठा पकडला गेला. टँकर जप्त करण्यात आला आहे, नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपास अहवाल आल्यानंतर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.’
2 मुलांचा मृत्यू
गुरुवारी रात्री आग्रा येथील कागरौल येथे 11 महिन्यांच्या ‘अवान’ आणि 2 वर्षांच्या ‘माहिरा’ या दोन निष्पाप मुलांचा दूध पिऊन मृत्यू झाला. हे दूध जगनेर येथील बच्चू डेअरीमधून आणण्यात आले होते. अन्न विभागाच्या पथकाने तिथेही छापा टाकला आणि नमुने घेतले. भविष्यात कोणत्याही दूधात किंवा अन्नपदार्थात भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न विभागाने दिला आहे.
भेसळयुक्त अन्नामुळे वाढत आहे गंभीर आजारांचा धोका; खाण्यापूर्वी घरीच तपासून पाहू शकता शुद्धता
बनावट दूध धोकादायक
भेसळयुक्त दूध म्हणजे असे दूध ज्यामध्ये बनावट किंवा हानिकारक पदार्थ मिसळून त्याची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवले जाते. त्यात पाणी, डिटर्जंट, युरिया, स्टार्च, ग्लुकोज, शाम्पू, साबण, बोरिक अॅसिड, हायड्रोजन पेरॉक्साइड सारखी रसायने मिसळता येतात. हे सर्व आरोग्यासाठी धोकादायक आहेत.
भेसळयुक्त दूध पिण्यामुळे पोटदुखी, गॅस, अपचन, उलट्या आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. डिटर्जंट्स आणि इतर रसायने आतड्याच्या अस्तरांना नुकसान करतात, ज्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो. डिटर्जंट्स, युरिया आणि इतर रसायने शरीरात विषासारखे काम करतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते.
आरोग्यावर परिणाम
भेसळयुक्त दुधाचे दीर्घकाळ सेवन केल्याने मूत्रपिंड आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतात. युरिया आणि अमोनिया सारखी रसायने मूत्रपिंडाची फिल्टरिंग क्षमता कमकुवत करतात. विषारी घटकांना विषमुक्त करण्यासाठी यकृताला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे त्याच्या कार्यावर परिणाम होतो.
तसंच दुधापासून कॅल्शियम मिळणे अपेक्षित आहे, परंतु भेसळीमुळे हा फायदा होत नाही. हाडे कमकुवत होऊ शकतात, ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. याशिवाय काही संशोधनात असे आढळून आले आहे की भेसळयुक्त दुधात असलेले हायड्रोजन पेरोक्साइड, फॉर्मेलिन सारखी रसायने कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. ते जास्त काळ सेवन केल्याने शरीरातील पेशींचे नुकसान होते आणि DNA उत्परिवर्तन होण्याची शक्यता वाढते.
उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात मिळणारे भेसळयुक्त गूळ ‘या’ पद्धतीने ओळखा
कसे ओळखावे भेसळयुक्त दूध
दुधाची लावली विल्हेवाट
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.