गुळातील भेसळ ओळखण्यासाठी सोप्या टिप्स
दिवाळी उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीसह इतर उत्सवांमध्ये बाजारात गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विकारी केली जाते. त्यातील काही पदार्थ भेसळयुक्त असतात. तेल, मिठाई, खवा, तूप, तांदूळ इत्यादी सर्वच पदार्थ भेसळ करून विकले जातात. भेसळ करून पदार्थ विकल्यामुळे दुकानदाराचा नफा होतो, मात्र आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडून पोटात दुखणे, पचनक्रिया बिघडणे, त्वचेसंबंधित समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात गूळ आणि साखरेला मोठी मागणी असते. त्यात गूळ प्रामुख्याने वापरले जाते. पण बाजारात मिळणारे हेच भेसळ युक्त गूळ आरोग्यासाठी हानिकारक आहे.
भेसळयुक्त गुळामध्ये हानीकारक केमिकल्स, स्वस्त साखर इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे पदार्थ बनवण्यासाठी गूळ वापरत असाल तर त्याची योग्य पडताळणी करणे आवश्यक आहे. गुळाचा दर्जा तपासूनच गूळ खरेदी करावे. आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त गूळ ओळखण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स इतर भेसळ युक्त पदार्थ ओळखण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतील.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: दिवाळीमध्ये अभ्यंगस्नानासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा केमिकल फ्री सुगंधी उटणे
हे देखील वाचा:नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर फेकून देतील Vitamin B युक्त 5 भाज्या, खायला आजच सुरू करा
बाजारात गुळाचे अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये काळ्या रंगाचे गूळ आणि पिवळ्या रंगाचे गूळ असे दोन प्रकार आहेत. काळ्या रंगाचे गूळ चिक्की किंवा चिकट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच बाजारात गुळाची बारीक पावडरसुद्धा मिळते. या पावडरचा वापर गोड पदार्थ बनवण्यासाठी, चहा बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे गूळ खरेदी करताना वरील गोष्टी व्यवस्थित तपासून पाहाव्यात.