Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Ukdiche Modak Recipe : गणेशोत्सवात आवर्जून तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. तुम्हालाही घरी परफेक्ट रुचकर असे उकडीचे मोदक तयार करायचे असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2026 | 10:17 AM
Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट 'उकडीचे मोदक'

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट 'उकडीचे मोदक'

Follow Us
Follow Us:
  • लवकरच बाप्पाचे आगमन होणार नाही.
  • मोदक हा गणपतीचा आवडीचा पदार्थ.
  • चला उकडीच्या मोदकांची रेसिपी जाणून घेऊया.
गणेशोत्सव म्हटलं की घराघरात बाप्पाच्या आवडीचा मोदक आवर्जून केला जातो. त्यातही तांदळाच्या पिठाची मऊसूत उकड आणि गुळ-खोबऱ्याचा सुगंधी सारण असलेले उकडीचे मोदक हे महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीतील खास पदार्थ मानला जातो. उकडीचे मोदक बनवताना उकड योग्य प्रकारे मळणे आणि मोदकाची पाकळी पातळ करणे या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. योग्य प्रमाणात पाणी घेऊन उकड तयार केली आणि ती गरम असतानाच व्यवस्थित मळली, तर मोदकाची पारी सहज तयार होते. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने मऊ, स्वादिष्ट आणि सुंदर उकडीचे मोदक कसे बनवायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून बनवा टेस्टी कुरकुरीत रोटी कटलेट; चव लागेल भारी! नोट करून घ्या रेसिपी

साहित्य

उकडीसाठी

  • १ कप बारीक तांदळाचे पीठ
  • १ कप पाणी
  • १ चमचा तूप
  • चिमूटभर मीठ
सारणासाठी
  • १ कप ताजे किसलेले खोबरे
  • ३/४ कप चिरलेला किंवा किसलेला गूळ
  • १ चमचा तूप
    ½ चमचा वेलची पूड
  • थोडी जायफळ पूड
  • १ चमचा खसखस, आवडीनुसार
कृती
  • कढईत तूप गरम करून त्यात किसलेले खोबरे आणि गूळ घाला. मंद आचेवर मिश्रण ढवळत राहा. गूळ वितळून मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यात वेलची आणि जायफळ पूड घाला. सारण जास्त वेळ शिजवू नका, अन्यथा ते कोरडे होऊ शकते.
  • एका भांड्यात एक कप पाणी घ्या. त्यात तूप आणि मीठ घालून पाणी उकळू द्या. पाण्याला चांगली उकळी आली की गॅस मंद करा.
  • उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ एकदम घालून लगेच झाकण ठेवा. साधारण एक ते दोन मिनिटे झाकण ठेवून पीठ वाफवून घ्या. त्यानंतर चमच्याने मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
  • उकड थोडी गरम असतानाच हाताला पाणी किंवा तूप लावून ती मऊसर मळून घ्या. उकडीत गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. उकड जितकी मऊ आणि लवचिक असेल, तितकी मोदकाची पारी चांगली तयार होते.
  • उकडीचा छोटा गोळा घेऊन त्याला हाताच्या तळव्यावर गोलसर पसरवा. बोटांच्या मदतीने पारी शक्य तितकी पातळ करा. पारीच्या कडेवर बारीक घड्या पाडत मध्यभागी सारण भरा.
  • सारण भरल्यानंतर पारीच्या सर्व घड्या एकत्र आणून मोदकाचे टोक बंद करा. मोदकाचा पारंपरिक शिखराचा आकार व्यवस्थित द्या. सर्व मोदक याच पद्धतीने तयार करून घ्या.
  • मोदकपात्रात किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करा. चाळणीला किंवा मोदकाच्या पानाला थोडे तूप लावून त्यावर मोदक ठेवा. साधारण १० ते १५ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. मोदकाची उकड थोडी पारदर्शक आणि चमकदार दिसू लागली की मोदक तयार आहेत.
Ganeshotsav 2026: कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते ‘या’ पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

परफेक्ट मोदकासाठी महत्त्वाच्या टिप्स

  • उकडीसाठी तांदळाचे पीठ बारीक आणि चांगल्या प्रतीचे वापरा.
  • पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • उकड पूर्णपणे थंड होण्याआधी मळल्यास ती अधिक मऊ होते.
  • पारी जाड ठेवू नका; पातळ पारीमुळे मोदक अधिक नाजूक लागतो.
  • सारणामध्ये गूळ जास्त शिजवू नका, त्यामुळे ते कडक होऊ शकते.
  • मोदक वाफवताना पाण्याची वाफ सतत राहील याची काळजी घ्या.
  • तयार मोदकावर थोडे तूप घालून गरमागरम नैवेद्य दाखवल्यास त्याची चव आणखी खुलते.

Web Title: Ganeshotsav 2026 festival special make traditional ukdiche modak at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते ‘या’ पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ
1

Ganeshotsav 2026: कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते ‘या’ पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

Dholya Ganpati History: वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास
2

Dholya Ganpati History: वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास

रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून बनवा टेस्टी कुरकुरीत रोटी कटलेट; चव लागेल भारी! नोट करून घ्या रेसिपी
3

रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून बनवा टेस्टी कुरकुरीत रोटी कटलेट; चव लागेल भारी! नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना
4

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.