
महिनाभरात त्वचा होईल देखणी! चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित प्या 'हे' हेल्दी ड्रिंक
त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट त्वचेसाठी वापरले जातात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा काहीकाळ अतिशय सुंदर दिसते. पण कालांतराने त्वचेच्या समस्या पुन्हा एकदा वाढू लागतात. त्यामुळे त्वचेला बाहेरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदल, आहारात सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरसोबत त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, ऍक्ने किंवा खूप जास्त चिकटपणा वाढतो. आज आम्ही तुम्हाला गणपती उत्सवापर्यंत त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी या पदार्थांपासून बनवलेले हेल्दी ड्रिंक प्यावे. हे ड्रिंक त्वचा आतून सुधारण्यास मदत करते.(फोटो सौजन्य – istock)
Hair Care: सकाळी की रात्री? केसांना तेल कधी लावावं? जाणून घ्या Hair Oiling ची योग्य वेळ
सकाळी उठल्यानंतर नियमित केशर मनुक्यांचे पाणी प्यावे. यासाठी एक ग्लास पाण्यात केशर काड्या आणि मनुके घालून रात्रभर तसेच ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर पाण्याचे सेवन करावे. हे ड्रिंक महिनाभर नियमित प्यायल्यास त्वचेवरील चमक वाढण्यासोबतच पिंपल्स आणि ऍक्ने कमी होण्यास मदत होते. नितळ आणि ग्लोइंग त्वचेसाठी वारंवार महागड्या ट्रीटमेंट किंवा स्किन केअरमध्ये बदल करणे अजिबात योग्य नाही. केमिकल घटकांनी तयार केलेल्या प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचा कालांतराने पूर्णपणे निस्तेज होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करावेत.
केशर आणि मनुक्यांचा समावेश रोजच्या आहारात करावा. काळे मनुके शरीराला आणि त्वचेला आवश्यक पोषण देतात. काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि केशरमध्ये नॅचरल अँटिऑक्सिडंट्स जास्त असल्यामुळे त्वचेवर चमकदार ग्लो येतो. काळ्या मनुक्यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि पोलिफेनल्ससारखे प्लांट कंपाउंड्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. केशर खाल्ल्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते आणि त्वचा आतून स्वच्छ होते.
काळे मनुके आणि केशरपासून बनवलेले हेल्दी ड्रिंक प्यायल्यामुळे अँटिऑक्सिडंट्सयुक्त आवश्यक घटक शरीराला मिळतात. तसेच त्वचेचे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी काळे मनुके आणि केशराचे पाणी प्यावे. महिनाभर नियमित केशर आणि काळ्या मनुक्यांचे पाणी प्यायल्यास त्वचेवरील चमक वाढण्यासोबतच त्वचा उजळदार आणि सुंदर होते. याशिवाय त्वचेची काळजी घेण्यासाठी केवळ केशर आणि मनुक्यांचे पाणी नाहीतर भरपूर पाणी, फायबर, पुरेशी झोप आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.
Ans: हो, पौष्टिक घटक, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले पेय संतुलित आहाराचा भाग म्हणून त्वचेच्या आरोग्यास मदत करू शकते. मात्र केवळ एका पेयामुळे त्वचा महिनाभरात हमखास चमकदार होईल असे म्हणता येत नाही.
Ans: फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य, सुका मेवा आणि प्रथिने यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा संतुलित आहारात समावेश करावा. विविध पोषक घटक त्वचेच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
Ans: एखादे विशिष्ट पेय पिल्याने पिंपल्स नक्कीच कमी होतील असे सांगता येत नाही. संतुलित आहार, योग्य त्वचास्वच्छता आणि आवश्यक असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला अधिक महत्त्वाचा आहे.