
केस होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' नैसर्गिक पदार्थ, महिनाभरात केसांची होतील झपाट्याने वाढ
हल्ली प्रत्येकालाच लांबलचक, मजबूत आणि घनदाट केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वातावरणात होणारे बदल, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. केसांच्या वाढीस आवश्यक असलेले योग्य पोषण न मिळाल्यास केसांची वाढ थांबते आणि केस पूर्णपणे कोरडे, निस्तेज होऊन जातात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला केसांच्या घनदाट आणि मजबूत वाढीसाठी खोबरेल तेलात कोणते पदार्थ मिक्स करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे केसांची झपाट्याने वाढ होईल आणि केस मजबूत होतील.(फोटो सौजन्य – istock)
मागील अनेक वर्षांपासून खोबरेल तेलाचा वापर जेवण बनवण्यासोबतच केसांच्या वाढीसाठी सुद्धा केला जातो. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या हेअर ट्रीटमेंट केल्या जातात. पण त्याऐवजी खोबरेल तेलात कडीपत्त्याची पाने मिक्स करून लावावी. टोपात खोबरेल तेल गरम करून त्यात कडीपत्त्याची पाने टाकून ठेवा. त्यानंतर तेल थंड झाल्यानंतर गाळून केसांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. तेलात फॅटी ॲसिड्स, विटामिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कोरफड जेल मिक्स करून लावावे. यामुळे केस अतिशय मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. कमकुवत झालेली केसांची मूळ मजबूत करण्यासाठी कोरफड जेल मिक्स केलेले तेल केसांवर लावून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांच्या मुळांना खोलवर पोषण मिळते आणि केस मजबूत होण्यास मदत होते.
तुमच्या केसांमध्ये खूप जास्त कोंडा किंवा गर्मीमुळे टाळूवर इन्फेक्शन वाढले असेल तर मेथी दाण्यांची पेस्ट किंवा मेथी दाण्यांचा वापर करून बनवलेले तेल केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करावे. मेथी दाण्यांच्या वापरामुळे केस लांबलचक आणि घनदाट होण्यास मदत होतात. निर्जीव केसांना पोषण मिळून केस मजबूत होतात. केस वेगाने वाढवण्यासाठी खोबरेल तेलात कांद्याचा रस मिक्स करून लावावा. बारीक, पातळ झालेले केस जाड होतात आणि केसांची चमक वाढते.