Curd Benefits: दह्यासोबत साखर की मीठ काय खावे? आरोग्यासाठी नेमकं काय अधिक फायदेशीर? जाणून घ्या
काही मेकअप प्रोडक्ट्समध्ये फॉर्मल्डिहाइड, पॅराबेन्स, फ्थॅलेट्स, लीड (शिसे) यांसारखी रसायने आढळू शकतात. या घटकांचा शरीराशी सतत संपर्क आल्यास त्वचेची अॅलर्जी, जळजळ, हार्मोनल असंतुलन आणि दीर्घकाळात गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रोडक्ट्सवरील घटकांची यादी वाचणे आवश्यक आहे.
निकृष्ट दर्जाच्या काही लिपस्टिकमध्ये शिसे किंवा इतर जड धातूंचे अंश असू शकतात. ही रसायने शरीरात हळूहळू जमा होतात. दीर्घकाळच्या वापरामुळे मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि हार्मोनल संतुलनावर परिणाम होऊ शकतो.
फाउंडेशन त्वचेवर एका थराप्रमाणे काम करते, परंतु त्यात असलेले पॅराबिन्स, सिलिकॉन आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज त्वचेच्या पोअर्समार्फत शरीरात प्रवेश करू शकतात. दीर्घकाळ वापरल्यास हे घटक हार्मोन्सवर परिणाम करू शकतात.
या प्रोडक्ट्सच्या सततच्या वापरामुळे रसायनांचे शरीरावर विषारी परिणाम होऊ शकतात, ज्यांचा संबंध अनेक आरोग्य अहवालांमध्ये कर्करोगाच्या धोक्याशी जोडला गेला आहे.
नेलपॉलिशमध्ये अनेकदा टोल्युइन, फॉर्मल्डिहाइड आणि डायब्युटिल फॅथलेट यांसारखी रसायने असतात. या तीन रसायनांचा दीर्घकाळ वापर केल्यास हार्मोनल असंतुलन, प्रजनन आरोग्याच्या समस्या आणि विषबाधा होऊ शकते. त्यामुळे दर्जेदार ब्रँडची प्रोडक्ट्स निवडणे अधिक सुरक्षित ठरते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Kidney Health: किडनी निरोगी ठेवायची आहे? रोजच्या जीवनात करा ‘या’ सोप्या सवयींचा अवलंब






