केस काळे करण्यासाठी तीळाच्या तेलात मिक्स करा 'हा' पदार्थ
महिलांसह पुरुषांनासुद्धा सुंदर काळे केस हवे असतात. केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी आहारात केला जाणारा बदल, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा केस सुंदर दिसत नाही. बिघडलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासह केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे काहीवेळ केसांमध्ये कोंडा होणे, केस अचानक पांढरे होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय काहींचे केस वयाच्या तिशीमध्येच पांढरे दिसू लागतात. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी महिला हेअर कलर किंवा डाय वापरतात. पण तरीसुद्धा केस काळे दिसत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
बऱ्याचदा पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट किंवा हेअर कलर लावतात. मात्र केसांना सतत हेअर कलर लावल्यामुळे केस आणखीनच खराब होण्याची शक्यता असते. केस निस्तेज आणि कोरडे होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाचा वापर केल्यामुळे केस अतिशय काळे आणि मजबूत होतील.
केसनं योग्य पोषण न मिळाल्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे किंवा केसांसंबधित इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करावा. तिळाच्या तेलात असलेले गुणधर्म केसांना पोषण देतात. त्यामुळे केसांच्या मुळांना तिळाचे सेवन लावावे. केसांची खुंटलेली वाढ रोखण्यासाठी तीळाचे तेल मदत करते.
पांढरे केस काळे करण्यासाठी तिळाच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करून केसांवर लावावा. यामुळे केस पांढरे होण्यास मदत होईल. यासाठी तिळाचे तेल कोमट गरम करून घ्या. तेल थंड झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिक्स करा. त्यानंतर तेल पुन्हा एकदा गरम करण्यासाठी ठेवा. तेलाला फेस येईपर्यंत तेल उकळवून घ्या. त्यानंतर तयार करून घेतलेले तेल गाळून बाटलीमध्ये भरून ठेवा. यामुळे केस गळती थांबेल आणि केस सुंदर आणि चमकदार दिसू लागतील. हे तेल नियमित ३ किंवा ४ दिवस केसांवर लावल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.